एक्स्प्लोर

Mumbai Train Accident : मुंब्रा लोकल अपघाताच्या सहा थेअरी समोर, दुर्घटना नेमकी कशामुळे घडली? 

Mumbra Train Accident : मुंब्र्याच्या धोकादायक वळणावर झालेल्या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार याचं उत्तर मात्र मिळण्याची शक्यता कमी आहे. 

Mumbai Local Train Accident : सोमवारी, 9 जून रोजी सकाळी मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा स्टेशनजवळ एक भीषण दुर्घटना घडली. लोकलच्या दरवाजावर लटकणारे प्रवासी धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले. यात चौघांनी आपला जीव गमावला. लोकलमधल्या गर्दीमुळे आणि स्टेशनजवळच्या एका धोकादायक वळणामुळे ही दुर्घटना झाल्याचं बोललं जात आहे. पण या दुर्घटनेमागे इतरही काही तर्कही लढवले जात आहेत.

चार जणांचा जीव घेणारी आणि नऊ जणांना आयुष्यभराचा धक्का देणारी ही मुंब्रा लोकल दुर्घटना. 9 जूनच्या सकाळी झालेल्या या भीषण दुर्घटनेत 4 कुटुंबांनी त्यांच्या घरातल्या कर्त्या माणसांना गमावलं. तर 9 जणांनी मरणाला अगदी जवळून पाहिलं.

हे सगळं का घडलं? यात कुणाची चूक होती? यावर आजही चर्चा सुरुच आहे. यावरुन आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि रेल्वे प्रशासनानं तर यावर उपाय म्हणून लोकलच्या 'बंद' दरवाजाचा मार्गही 'खुला' केला आहे. पण ही दुर्घटना घडण्यामागे सहा थिएरी समोर येत आहेत. त्या कोणत्या आहेत ते पाहुयात,

1. लटकणारे प्रवासी एकमेकांना घासले

मुंब्रा स्टेशनजवळच्या एका धोकादायक वळण आहे. याच वळणावर कसाऱ्याकडून मुंबईकडे आणि ठाण्याहून कल्याणच्या दिशेनं जाणारी लोकल समोरासमोर आल्या. या दोन ट्रेनमधील अंतर इतकं कमी होतं की गर्दीमुळे दरवाजाला लटकणारे दोन्ही ट्रेनमधील प्रवासी एकमेकांना घासले आणि ट्रॅकवर पडले. 

2. लटकणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा घासल्या

गर्दीच्या वेळी ऑफिसमध्ये, घरी किंवा इच्छित स्थळी वेळेवर पोहोचण्यासाठी प्रवासी लोकलला अक्षरश: लटकून प्रवास करतात. याच लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा मुंब्र्याच्या त्या धोकादायक वळणावर घडलेल्या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे. त्या धोकादायक वळणावर दोन ट्रेन अगदी जवळ आल्या तेव्हा लटकलेल्या प्रवाशांचा बॅगा घासल्या गेल्या. त्यामुळे काही प्रवासी दरवाजातून थेट ट्रॅकवर पडले.)) 

3. प्रवाशांमधल्या भांडणामुळे दुर्घटना

गर्दीच्या वेळी मुंबई लोकलमधल्या प्रवाशांमधली भांडणं नवी नाहीत. सोमवारी सकाळीही अशाच प्रकारची भांडणं झाली. त्यातूनच अपघाताची घटना घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र याला प्रत्यक्षदर्शी कोणताही पुरावा नाही.

4. सेल्फी स्टिकमुळे दुर्घटना

लोकलच्या दरवाजात प्रवास करणारा एखादा प्रवासी सेल्फी स्टिकनं शूट करत होता. मात्र मुंब्र्याच्या धोकादायक वळणावर त्याची सेल्फी स्टिक समोरच्या लोकलच्या प्रवाशांमध्ये अडकली. याच गदारोळात त्या प्रवाशासह इतर सहप्रवासी आणि समोरच्या लोकलमधले प्रवासीही खाली पडले अशी थिअरी मांडली जात आहे. 

5. एका प्रवाशाला उलटी आली अन्...

लोकलमध्ये गर्दीच्या वेळी घुसमटून एका प्रवाशाला उलटी झाली असावी. त्यामुळे तो दरवाजाजवळ आला. याच सगळ्या गदारोळात सहप्रवाशांना धक्का लागून प्रवासी ट्रॅकवर कोसळले.

6. ट्रॅकवरील लोखंडी रॉडमुळे अपघात

एका लोकल डब्यावरचे ओरखडे पाहता लोखंडी रॉड किंवा अन्य वस्तू धडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धक्क्यामुळेच  प्रवासी धडाधड खाली कोसळले असावेत असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

ही झाली अपघाताची एक ना अनेक कारणं. पण या सगळ्यात एक मुद्दा प्रकर्षानं अधोरेखित होतो तो म्हणजे रेल्वे प्रशासन, आणि सरकारचा कारभार. लोकलमधली प्रचंड गर्दी, लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या, प्लॅटफॉर्मची लांबी आणि 
डब्यांची तोकडी संख्या. हे आणि असे अनेक प्रश्न मुंबईकर लोकल प्रवासी गेली अनेक प्रशासनासमोर मांडत आहे. त्याची दखल वेळेवर घेतली गेली असती तर?

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
Ganesh Festival 2026 MSRTC : गौरी-गणपतीसाठी एसटी महामंडळाचा मेगाप्लॅन, कोकणात एसटीच्या 5,220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget