Mumbai Local Mega Block Sunday : रविवारी लोकल प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाच्यावतीने  रविवारी 4 ऑगस्ट रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत लोकल ट्रेन विलंबाने धावतील. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे.  

मध्य रेल्वे (Central Mega Block) 

कुठे - माटुंगा ते मुलुंड अप - डाऊन धीम्या मार्गावरकधी - सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंतपरिणाम: या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर रेल्वे (Harbour Mega Block) 

कुठे - वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावरकधी - सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ वडाळा येथून वाशी/बेलापूर/पनवेल याकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल / बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते मानखुर्द दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वे (Western Mega Block) 

कुठे  -  वसई रोड ते भाईंदर अप- डाऊन धीम्या मार्गावरकधी - शनिवारी - रविवारी रात्री 12.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंतपरिणाम : या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा विरार/वसई रोड ते बोरिवली / गोरेगांव रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील.

हे ही वाचा :

मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही, हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडलाच संपणार