Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो (Mumbai) रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा. कारण, रविवारी मध्ये रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामामुळे उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक (Megablock) घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीनं देण्यात आली आहे. मध्ये रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. रविवार असल्यामुळे लोकलची संख्या काही प्रमाणात कमी असणार आहे. 


मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवारी रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करत पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक चालवेल.  ठाणे - कल्याण यादरम्यानस सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आलाय. 


 अप मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात येतील  
11010 पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेस, 17611 हजूर साहिब नांदेड- मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, 12124 पुणे - मुंबई डेक्कन क्वीन, 13201 पाटणा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 17221 काकीनाडा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 22160 चेन्नई-मुंबई एक्सप्रेस, 12168 बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस, 12321  हावडा- मुंबई मेल (प्रयागराज मार्गे), 12812 हटिया - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेच्या १०-१५  मिनिटे उशिराउशिराने पोहोचेल.


 डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या वळवण्यात येतील
11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्स्प्रेस आणि 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कल्याण येथे 10-15  मिनिटे उशिराने पोहोचेल.  16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस ठाणे आणि दिवा दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकापेक्षा दहा-पंधरा मिनिटे उशिरा चालेल.


 कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत  पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणारी आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- कुर्ला आणि पनवेल - वाशी या सेक्शन मध्ये विशेष लोकल चालविण्यात येतील.  ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ मार्गे सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.