Mumbai Local Mega Block: सध्या राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह सुरू आहे. घराघरांमध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येत आहे. मुंबईत प्रसिद्ध असणाऱ्या लागबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक महाराष्ट्रातून येत आहे. याचदरम्यान विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून (Central Railway) रविवारी (31 ऑगस्ट) रोजी मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर १०.५५ वाजेपासून ते दुपारी ०३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहील, याबाबत मध्य रेल्वेकडून पत्र जारी करण्यात आले आहे.

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.४८ वाजता ते दुपारी ०३.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान डाऊन फास्ट लाईनवर वळविण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील व नंतर विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धिम्या लाईनवर वळविण्यात येतील. घाटकोपर स्थानकातून १०.१९ वाजेपासून दुपारी ०३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर लाईन गाड्या रद्द-

कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन सेवा ११.१० वाजेपासून दुपारी ०४.१० वाजेपर्यंत रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.३४ वाजेपासून दुपारी ०३.३६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईन गाड्या आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी १०.१७ वाजेपासून दुपारी ०३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर लाईन गाड्या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि पनवेल – वाशी – पनवेल या मार्गांवर विशेष उपनगरी गाड्या चालवण्यात येतील. हार्बर लाईन प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० वाजेपासून सायंकाळी ०६.००वाजेपर्यंत ठाणे – वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी असेल.

Continues below advertisement

गणेश उत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या विशेष मध्यरात्री उपनगरी सेवा-

गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण/ठाणे व परतीसाठी विशेष मध्यरात्री उपनगरी सेवा चालवण्यात येणार आहेत. या गाड्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण दरम्यान ४/०५.०९.२०२५(गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री), ०५/०६.०९.२०२५ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्री) आणि ०६/०७.०९.२०२५(शनिवार/रविवार मध्यरात्री) रोजी धावतील.हार्बर मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या ०६/०७.०९.२०२५ रोजी (शनिवार/रविवार रात्री) गणपती विसर्जनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परतीच्या प्रवासासाठी धावतील.

विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार थांबतील.

डाउन मेन मार्गीकेवर (०४/०५.०९.२०२५; ०५/०६.०९.२०२५ आणि ०६/०७.०९.२०२५ रोजी)

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.१० वाजता पोहोचेल.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –ठाणे विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कल्याण विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४.५५ वाजता पोहोचेल.

अप मेन मार्गीकेवर (०४/०५.०९.२०२५, ०५/०६.०९.२०२५ आणि ०६/०७.०९.२०२५ रोजी)

- कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी कल्याण येथून ००:०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०१:३० वाजता पोहोचेल.

- ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी ठाणे येथून ०१:०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२:०० वाजता पोहोचेल.

- ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी ठाणे येथून ०२:०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३:०० वाजता पोहोचेल.

 डाउन हार्बर मार्गावर (०६/०७.०९.२०२५ रोजी)

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.३० वाजता सुटेल व पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२.४५ वाजता सुटेल व पनवेल येथे ०४.०५ वाजता पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर (०६/०७.०९.२०२५ रोजी)

- पनवेल–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२.२० वाजता पोहोचेल.

- पनवेल–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३.०५ वाजता पोहोचेल.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO: