मुंबई: मध्य रेल्वेवरील (Central Railway) हार्बर लाईनवरील (Harbour Line) वाहतूक सीएसएमटी ते वडाळा दरम्यान पूर्णपणे बंद झालेली आहे. पनवेलवरुन येणाऱ्या लोकलचा एक डबा रुळावरुन (Local Coach derailed) घसरला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ हार्बर लाईनवरील पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलचा एक डब घसरला. यामुळं हार्बर लाईनवरील वाहतूक वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यानची दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील वाहतूक सुरळीत असून त्यावर कसलाही परिणाम झालेली नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
लोकलचा डबा किती वाजता घसरला
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ हार्बर लाईनवरुन पनवेलवरुन लोकलचा एक डबा घसरला. लोकल दोन नंबर प्लॅटफॉर्मवर येत असताना डबा घसरला. ही घटना 11.35 मिनिटांनी घडली. यामुळं हार्बर लाईनवरील अप आणि डाऊन मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा या दरम्यानची वाहतूक बंद आहे. सुरुवातीला हार्बर लाईनवरील काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांमध्ये थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर या गाड्या मशीद बंदर स्थानकापर्यंत आणून प्रवाशांना सोडलं जाईल, अशी माहिती आहे. त्याचवेळी वडाळा स्थानकातून पनवेल, वडाळा कुर्ला आणि वडाळा गोरेगाव अशी सेवा सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळ हार्बर लाइन वरील प्लॅटफॉर्म नंबर दोन वर जाणाऱ्या एका लोकलचा डबा घसरला आहे. ही लोकल पनवेल वरून सीएसएमटी स्थानकात जात होती. लोकलचा वेग कमी असल्यामुळे कोणत्याही प्रवासाला दुखापत झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. गेल्या अर्धा तासापासून सीएसएमटी स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या हार्बर लाईवरील लोकल बंद आहेत. वडाळा ते सीएसएमटी लोकलची जाणारी आणि येणारी पूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
मुख्य लाईनवरील वाहतूक सरुळीत
मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत झालेली असताना मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती आहे. हार्बर लाईनवर रुळावरुन घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. रेल्वेकडून डबा पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, तोपर्यंत हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत होईल. याशिवाय हार्बर मार्गावरील वेळापत्रक देखील कोलमडणार आहे.
संबंधित बातम्या :
Harbour Local : हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत; CSMT जवळ लोकलचा डबा घसरला : ABP Majha