Mumbai Local Mega Block news : मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर एकाच वेळी महा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे, ठाणे स्थानकात आज रात्रीपासून पुढील 63 तास मेगाब्लॉक असेल, तर सीएसएमटी स्थानकात शनिवारी आणि रविवारी असा 36 तासांचा मेगाब्लॉक असेल, या दोन्ही मेगाब्लॉकमुळे शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवशी मध्य आणि हार्बर मार्गावर एकूण 930 लोकल रद्द केल्या जाणार आहेत, तर या तीन दिवसात एकूण 72 लांब पल्यांच्या गाड्या देखील रद्द असतील, ज्या लोकल सुरू असणार आहेत त्या देखील कर्जत कसारा ते दादर आणि भायखळापर्यंतच धावतील. सी एस एम टी ते भायखळा पूर्णतः बंद असेल, त्याचप्रमाणे हार्बर लाइनवर देखील पनवेल पासून घड्याळापर्यंतच लोकल धावतील, त्यापुढे लोकल धावणार नाहीत, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द केल्याने प्रवाशांना याचा नक्कीच त्रास होणार आहे, मात्र त्या बदल्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांची आणि ठाणे स्थानकातील पाच आणि सहा नंबर फलाटाची प्रवासिक क्षमता वाढवण्यासाठी हे काम गरजेचे आहे असे मध्य रेल्वे कडून सांगण्यात आले आहे, सहा महिने ज्या कामासाठी लागतील तेच काम केवळ 63 तासांमध्ये ठाणे स्थानकात करण्यात येईल, हे काम नेमके कसे असेल आणि आज रात्रीपासून सुरू होणारा मेगाब्लॉक संदर्भात जाणून घेऊयात..


ब्लॉकचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:


अ. ब्लॉक १ - ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक (डाऊन जलद मार्गिका)
ब्लॉक दिनांक आणि कालावधी: दि. ३०/दि.३१.०५.२०२४ (गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री) ००.३० वाजता ते दि. ०२.०६.२०२४ (रविवार दुपारी) १५.३० वाजेपर्यंत = ६३ तास


ब्लॉक विभाग:  
अप धीमी मार्गिका : कलवा (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि क्रॉसओव्हर्ससह) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह)
डाऊन जलद मार्गिका: ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह) ते कळवा (सर्व क्रॉसओव्हर्ससह) 
अप जलद मार्गिका: कलवा (सर्व क्रॉसओव्हर्ससह) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह)


B. ब्लॉक २ - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक


ब्लॉक दिनांक: दि. ३१.५.२०२४/दि.०१.६.२०२४ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्री) च्या ००.३० वाजता ते दि. ०२.६.२०२४ (रविवार दुपारी) १२.३० वाजेपर्यंत - ३६ तास 


ब्लॉकचा कालावधी:


डाऊन जलद मार्गिका : ००.३० वाजता (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते १५:३० वाजता (रविवार) 
                               ६३ तास
अप धीमी मार्गिका: ००.३० तास (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते १२:३० तास (शुक्रवार ) 
                              १२ तास


ब्लॉक विभाग:  


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सहीत) आणि वडाळा रोड (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सह) आणि भायखळा (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (यासह) आणि भायखळा (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग


ब्लॉक दरम्यान उपनगरीय गाड्यांवर परिणाम उपनगरीय सेवा रद्द:


ब्लॉक कालावधीत ९३० उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे रद्द केल्या जातील:
दि.३१.५.२०२४ (शुक्रवार) रोजी १६१ सेवा रद्द केल्या जातील.
दि.०१.६.२०२४ (शनिवार) रोजी ५३४ सेवा रद्द केल्या जातील.
दि.०२.६.२०२४ (रविवार) रोजी २३५ सेवा रद्द केल्या जातील.


उपनगरीय सेवा रद्द:
ब्लॉक कालावधीत ४४४ उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे रद्द केल्या जातील:


दि.३१.५.२०२४ (शुक्रवार) रोजी ७ सेवा रद्द केल्या जातील.
दि.०१.६.२०२४ (शनिवार) रोजी ३०६ सेवा रद्द केल्या जातील 
दि.०२.६.२०२४ (रविवार) रोजी १३१ सेवा रद्द केल्या जातील.



उपनगरीय सेवा रद्द:
ब्लॉक कालावधीत ४४६ उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे कमी होतील:
दि. ०१.६.२०२४ (शनिवार) रोजी ३०७ सेवा रद्द केल्या जातील.
दि.०२.६.२०२४ (रविवार) रोजी १३९ सेवा रद्द केल्या जातील.


मध्य रेल्वेने सर्व आस्थापनांना विनंती केली आहे की या दिवशी प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्या संबंधित कर्मचाऱ्यांना घरून किंवा इतर कोणत्याही संभाव्य मार्गाने काम करण्याची संधी द्यावी. मध्य रेल्वेने प्रवाशांना या दिवसांत प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करावा असे आवाहन केले आहे.
हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि फायद्यासाठी आवश्यक आहेत