एक्स्प्लोर

Mumbai Local Accident: रेल्वेच्या 'ब्लॅक स्पॉट'पैकी एक; ट्रेनचा वेग, मोठं वळण, अपघात झाला, ते ठिकाण नेमकं कसंय?, VIDEO

Mumbai Local Accident: दोन रूळावरील अंतर कमी असल्याने दोन्ही रेल्वेच्या दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने हा अपघात घडल्याचे प्रशासनकडून सांगण्यात आले आहे.

Mumbai Local Accident: मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (Mumbai Local Accident) घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान 13 जण रेल्वेमधून पडले. कसाऱ्याहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी लटकून जात होते. त्याचवेळी सीएसएमटीवरुन निघालेली दुसरी लोकल प्रवाशांना घासली. यावेळी 13 प्रवासी खाली पडले आणि 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. ठाण्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी एबीपी माझाला माहिती दिली. दरम्यान जखमींवर कळवा आणि मुंब्र्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 10 जखमींपैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळवा रुग्णालयाने दिली. तर कळव्यातील काही जखमींना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

दोन रूळावरील अंतर कमी असल्याने दोन्ही रेल्वेच्या दरवाजात उभे राहणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने हा अपघात घडल्याचे प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. याबाबत आरपीएफचे डीआयजी हेमंत कुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना एक महत्वाती माहिती दिली. सदर प्रवासी लोकलमधून पडण्याची घटना ज्या ठिकाणी झाली, तो रेल्वेच्या ब्लॅक स्पॉटपैकी एक आहे. या ठिकाणी मोठं वळण आहे. आ ठिकाणी लोकलचा वेगही जास्त असतो, असं हेमंत कुमार म्हणाले. 

नेमकं काय घडलं?

- दोन लोकल ट्रेन आजूबाजूने जात असताना ही घटना घडली. 
- दिवा ते मुंब्रा दरम्यान ही दुर्घटना घडली.
- एक लोकल कसाराकडून सीएसटीकडे जात होती तर दुसरी लोकल सीएसटीकडून कल्याणकडे जात होती.
- सकाळी साडे नऊ वाजता दरम्यानची घटना... 
- दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी पडले. 
- दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला. 
- बॅगांची गुंतागुंत झाली आणि ही घटना घडल्याची शक्यता...
- पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. 
- ⁠एकूण 13 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

सदर घटनेत ४ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे(१ व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व ३ व्यक्तींना सिव्हिल रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे) व ९ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, येथे दाखल करण्यात आले आहे.

जखमी व्यक्तीची माहिती खालील प्रमाणे:

1) श्री. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
2) आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
3) रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
4) अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
5) तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व  त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
6) मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
7) मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
8) स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
9) प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती खालील प्रमाणे:

1) केतन दिलीप सरोज(पु/२३ वर्ष, राहणार: तानाजी नगर, उल्हासनगर)
2) राहुल संतोष गुप्ता
3) विकी बाबासाहेब मुख्यदल(पु/३४ वर्ष, रेल्वे पोलीस कर्मचारी)
4) अज्ञात व्यक्ती

संबंधित बातमी:

Mumbai Railway Accident News: मुंबईत मोठा रेल्वे अपघात, दोन लोकल आजूबाजूने धावत होत्या, प्रवाशांचा बॅग घासल्या अन् 8 प्रवाशी धडाधड ट्रॅकवर पडले, 6 जणांचा मृत्यू

Mumbai Local Train Accident: प्रवासी एकामागोमाग धडाधड ट्रेनमधून खाली पडत होते; रेल्वे स्टेशनवरील प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार अनुभव

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 
AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 
Devendra Fadnavis :अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर, अमेरिकन कंपन्यांना गुंतवणुकीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे खुले आमंत्रण
अणुऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर, अमेरिकन कंपन्यांना गुंतवणुकीचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे खुले आमंत्रण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
Bandra Demolition Explained : वांद्रे अतिक्रमण आणि राडा, झोपड्यांवर आताच बुलडोझर का? 10 मोठे मुद्दे!!
वांद्रे अतिक्रमण आणि राडा, झोपड्यांवर आताच बुलडोझर का? 10 मोठे मुद्दे!!

व्हिडीओ

Maharashtra on Petrol Diesel : देशात पुरेसा इंधनसाठा, मग इंधनटंचाई का? Special Report
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
NCP Merger Sharad Pawar Sunetra Pawar : पडदा विलिनीकरणावर लक्ष 'पवार 'नीतीवर Special Report
Rahul Gandhi Sharad Pawar on PM Modi काँग्रेसचे बोल कडवे,पवारांनी गायले गोडवे Special Report
PM Modi meets Italian PM Meloni : मोदी,मेलोनी आणि मेलोडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Re-Exam : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उच्चस्तरीय सुरक्षा बैठक; फेक टेलिग्राम चॅनेल्सवर कारवाईचे आदेश
NEET : फेक टेलिग्राम चॅनेल्सवर होणार मोठी कारवाई, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
छत्रपती संभाजीनगर हादरलं! पाच वर्षीय गतिमंद मुलाला सावत्र बापाने संपवलं, आईचाही गुन्ह्यात सहभाग
Giorgia Meloni : 'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
'परिश्रम ही सफलता की कुंजी'; मोदींसमोर हिंदीत बोलल्या जॉर्जिया मेलोनी, व्हिडीओ व्हायरल
Ladki Bahin Yojana : मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
मार्च एप्रिलच्या हप्त्याच्या 3000 रुपयांची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
EPFO : 7 कोटी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची चाचणी यशस्वी, मनसुख मांडवीय यांच्याकडून मोठी अपडेट 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2026 | बुधवार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Embed widget