Mumbai Water Issue: मुंबईच्या पाणीसाठ्याबाबतएकअतिशय दिलासादायक बातमीसमोरआलीआहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील साठा 6.75 टक्क्यांवरून 7.18 टक्क्यांवर आलाआहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा (Mumbai Dam Water Storage) करणाऱ्या सातही धरणांच्या पाणीसाठ्यात (Mumbai Water Issue) अखेर वाढ नोंदवली गेली आहे. मंगळवारी धरणांमधील एकूण पाणीसाठा 6.75 टक्के होता. तो बुधवारी वाढून 7.18 टक्क्यांवर पोहोचला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
Mumbai Rain : मुंबईच्या पाणीसाठ्यात दिलासादायक वाढ; सातही धरणांतील साठा 6.75 टक्क्यांवरून 7.18 टक्क्यांवर
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीसाठा चिंताजनक पातळीवर होता. मात्र, गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळे सातही धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून त्याचा सकारात्मक परिणाम एकूण साठ्यावर दिसून आला आहे. दरम्यान, सध्याचा पाणीसाठा अद्यापही समाधानकारक नसल्याने पुढील काही दिवस धरण क्षेत्रात चांगला पाऊस होणे आवश्यक आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
मुंबईमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई उपनगरात असलेला पवई तलाव ओसंडून वाहू लागलाय. तलावाची 545 कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असून या तलावाचे पाणी हे पिण्यायोग्य नाही. त्यामुळे हे पाणी औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. तर पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला पवई तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तलावाची सध्याची पाण्याची पातळी 195.10 फूट आहे. 545 कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या तलावातील पाणी पिण्यासाठी योग्य नाही. 1890 साली 12.59 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेला तलावाचे पाणलोट क्षेत्र 6.61 चौरस किलोमीटर आहे. जेव्हा तलाव पूर्णपणे भरतो तेव्हा पाण्याचे क्षेत्र सुमारे 2.23 चौरस किलोमीटर असते.
रकानदारीत तलावाची पूर्ण प्रवाह पातळी 195 फूट आहे. तलाव पूर्णपणे भरतो तेव्हा त्यात 545.5 कोटी लिटर पाणी असते. तलाव पूर्ण भरला की त्याचे पाणी मिठी नदीत वाहून जाते. गेल्या काही वर्षात हा तलाव भरल्यावर इथे पर्यटकांची गर्दी होते, परंतु यात काही जणांना जीव गमवावा लागल्याने इथल्या सुरक्षेबाबत चिंता ही व्यक्त केली जाते आहे.
दुसरीकडे, पालघर जिल्ह्याला मध्यरात्रीपासून पावसाने झोडपलं आहे. पूर्व भागात मध्यरात्री सुरू झालेल्या दमदार पावसाची पहाटेपर्यंत जोरदार बॅटिंग सुरूच आहे. पावसाचा तडाखा बसल्याने पालघरच्या धुकटण येथे राहत्या घराची भिंत कोसळली आहे. नारायण केशव काकरा यांच्या मालकीच्या राहत्या घराचा एक भाग पावसाच्या तडाख्यामुळे कोसळालाय. दुर्घटनेमुळे अन्नधान्य कपडे आणि घरातील सर्व साहित्याच नुकसान झालंआहे. मात्र सुदैवाने घरातून सगळ्यांनी पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळलीय. किंबहुना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी घरमालकांनीकेलीआहे.
Raigad Rain : रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
मागील दोन तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नागोठणे जवळील आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली असून रोहा मधील कुंडलिक नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झालीय.जिल्ह्यातील अन्य नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या खाली आहे. मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. २८ धरणातील पाणीसाठा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सुतारवाडी आणि पाभरे ही धरणे १०० टक्के भरली असून परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
