Mumbai Inflation: मुंबईतीलचाकरमान्यांचीकाहीशीचिंतावाढवणारीबातमीसमोरआलीआहे. दुधाच्या दरवाढीनंतर आता पावाच्या दरातही वाढ करण्यातआलीआहे. परिणामीत्याचाथेटपरिणामआता वडापाव (Vada Pav in Mumbai) आणि अन्य पावाच्या पदार्थांवर होणार असल्याचीशक्यताआहे. दुधाच्या दरवाढीनंतर आता पावाच्या लादींच्या किमतीतही वाढ झाली असून प्रति लादी तब्बल 5 रुपयांनी दर वाढवण्यात आले आहेत. मुंबईत सर्वाधिक प्रमाणात पाव विकला जातो. विशेषतः सर्वसामान्य चाकरमानी, कामगार आणि विद्यार्थी वर्ग वडापाव, मिसळपाव, भाजीपाव, सँडविच यांसारख्या पदार्थांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्यामुळे या दरवाढीचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर होणार आहे. (Mumbai Inflation News)
Mumbai Inflation News: 16 मेपासून पावाच्या लादींचे नवे दर लागू, दरवाढीमागीलकारणकाय?
मिळालेल्या माहितीनुसार, 16 मेपासून काही प्रमुख कंपन्यांनी पावाच्या लादींचे नवे दर लागू केले आहेत. सँडविच ब्रेड, होल व्हीट आणि मल्टीग्रेन प्रकारांमध्येही प्रति लादी 5 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. काही ठिकाणी ब्राऊन ब्रेडच्या किमती 45 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. बेकरी व्यावसायिकांच्या मते, प्लास्टिक पॅकिंग, वाहतूक खर्च, आयात होणारा कच्चा माल तसेच रुपयाच्या घसरणीमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातच दुधाच्या दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतींवर आणखी ताण निर्माण झाला आहे.
Mumbai News: प्रति लादी 5 रुपयांपर्यंत वाढ, सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशावर अतिरिक्त भार
मुंबईत दररोज लाखो लोक वडापाव आणि पावावर आधारित खाद्यपदार्थ खात असतात. त्यामुळे पावाच्या लादींच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असल्याची भावना ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.
ब्रेड दरवाढ : आधीची किंमत विरुद्ध नवी किंमत
400 ग्रॅम सँडविच ब्रेडआधी – ₹40आता – ₹45
होल व्हीट ब्रेडआधी – ₹55आता – ₹60
मल्टिग्रेन ब्रेडआधी – ₹60आता – ₹65
स्मॉल ब्राऊन लोफआधी – ₹28आता – ₹30
व्हाईट लोफआधी – ₹20आता – ₹22
ब्राऊन ब्रेडआधी – ₹45आता – ₹50
Petrol Diesel price hike: अवघ्या चार दिवसात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ
अवघ्या चार दिवसात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात हे 91 पैशांनी तर डिझेलच्या दर 94 पैशांनी वाढ करण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतील पेट्रोलच्या दर थेट 107.49 तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.02 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. 15 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि आता अवघ्या चार दिवसात पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये रोष दिसून येतोय.
इतरमहत्वाच्या बातम्या
