एक्स्प्लोर

मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?

इमारतीच्या सर्व दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे करण्यात यावीत, असे सांगत त्यांनी विद्युत यंत्रणा, फिटिंग्ज आणि इतर तांत्रिक सुविधांसाठी उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यावर भर दिला.

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या (Mumbai) नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ (Air india) इमारतीचे महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (shivendra bhosle) यांनी आज इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी मंत्री भोसले यांनी शासकीय कार्यालयांचे स्थलांतर करण्यापूर्वी इमारतीची सखोल स्ट्रक्चरल तपासणी करण्यात यावी तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतरच अंतर्गत सजावट व इतर विकासकामे हाती घेण्यात यावीत, असे निर्देश दिले.

कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता दीर्घकालीन टिकाऊपणा लक्षात घेऊन सर्व दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे करण्यात यावीत, असे सांगत त्यांनी विद्युत यंत्रणा, फिटिंग्ज आणि इतर तांत्रिक सुविधांसाठी उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यावर भर दिला. इमारतीच्या मुख्य प्रवेशभागाचे महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसे आकर्षक व सुशोभित स्वरूप विकसित करण्यात यावे. यासाठी देशातील नामांकित वास्तुविशारद व तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता, सुलभता आणि व्यवस्था ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे नमूद करत सर्व कामे निर्धारित कालावधीत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री भोसले यांनी दिले.

आजपासून इमारत अधिकृतपणे शासनाच्या ताब्यात

या मोक्याच्या जागेवरील इमारत खरेदीसाठी राज्य मंत्रिमंडळाने 8 सप्टेंबर 2023 रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर विविध प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाने ‘एअर इंडिया असेट होल्डिंग कॉर्पोरेशन’ (AIAHL) कडून 1601 कोटी रुपयांना ही वास्तू संपादित केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक निधी अदा केल्यानंतर 2 जून 2026 रोजी ही इमारत अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात घेण्यात आली. या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता तातडीने प्रदान करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या ऐतिहासिक वास्तूमुळे राज्य शासनाच्या विविध कार्यालयांसाठी प्रशस्त, आधुनिक आणि सुसज्ज जागा उपलब्ध होणार असून, प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) श्री. आबासाहेब नागरगोजे, मुख्य अभियंता सौ. प्रज्ञा वाळके तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी मंत्री भोसले यांना इमारतीची सद्यस्थिती, आवश्यक दुरुस्ती व प्रस्तावित नूतनीकरण कामांबाबत सविस्तर माहिती दिली.

आदर्श शासकीय संकुल म्हणून विकास

यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, “एअर इंडिया इमारतीचे राज्य शासनाकडे झालेले हस्तांतरण हा महाराष्ट्राच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. गुणवत्तापूर्ण दुरुस्ती, दीर्घकालीन टिकाऊपणा आणि नागरिकांच्या सोयीला सर्वोच्च प्राधान्य देत या वास्तूचा आदर्श शासकीय संकुल म्हणून विकास करण्यात येईल.”

हेही वाचा

मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारची तीन दुचाकीस्वरांना धडक, एकाचा जागीच मृत्यू, मुंबईतील विलेपार्लेत भीषण अपघात
कारची तीन दुचाकीस्वरांना धडक, एकाचा जागीच मृत्यू, मुंबईतील विलेपार्लेत भीषण अपघात
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
उबाठा संपवण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय, आम्हाला धमक्या देण्यापेक्षा आपलं घर संभाळा, प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल
उबाठा संपवण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय, आम्हाला धमक्या देण्यापेक्षा आपलं घर संभाळा, प्रतापराव जाधवांचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ
Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
मेलोनी म्हणाल्या, 'मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी...' जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
Embed widget