Rainfall in Mumbai due to Cyclone : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे (Biparjoy Cyclone) देशातील हवामानवर परिणाम झाला आहे. चक्रीवादळामुळे मुंबईत झालेल्या पावसामुळे मुंबईच्या तापमानात (Mumbai Temperature) घट झाली आहे. मुंबईसह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईसह उपनगरांत आणि ठाणे जिल्ह्यात अनेक भागांत रिमझिम पाऊस झाला आहे. पावसाच्या सरींमुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा!
चक्रीवादळामुळे मुंबईतील तापमान घट झाल्याची नोंद झाली आहे. सोमवारी मुंबईच्या कमाल तापमानामध्ये घट झाली आहे. चक्रीवादळामुळे हवामानत बदल झाला असून रविवारपासून शहरातील काही भागात पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. यामुळे मुंबईतील तापमन घसरलं आहे.
चक्रीवादळामुळे तापमान घसरलं
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रूझ वेधशाळेने सोमवारी किमान तापमान 24.5 अंश सेल्सिअस नोंदवलं, तर कुलाबा वेधशाळेत 24 अंश सेल्सिअस नोंदवलं गेले आहे. हे तापमान मुंबईच्या सामान्य पातळीपेक्षा दोन अंशांनी कमी आहेत. रविवारी सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 29.2 अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली होती.
मुंबईत पुढील 24 तास पावसासाठी अनुकूल वातावरण
आयएमडीने रविवारी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली होती. हवामान विभागाने या भागात येलो अलर्ट जारी केला होता. सोमवारी हवामान विभागाने माहिती दिली आहे की, मुंबईत पुढील 24 तास पावसासाठी अनुकूल वातावरण राहणार असून रिमझिम पाऊस सुरुच राहणार असल्याचा अंदाज आहे.
चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं
बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईच्या समांतर पुढे सरकलं आहे. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान ओलांडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारी ताशी 125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती आहे. बिपरजॉय मांडवी ते कराची दरम्यान कुठे धडकणार अद्याप यासंदर्भात स्पष्टता नाही.
चक्रीवादळाच तीव्रता वाढली
बिपरजॉय चक्रीवादळाची (Biparjoy Cyclone Update) तीव्रता वाढली आहे. बिपरजॉयने (Cyclone Biporjoy) अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. चक्रीवादळाने मार्ग बदलल्यामुळे आता भारतालाही (India) धोका निर्माण झाला आहे. मार्ग बदलल्यानंतर आता बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या (Gujrat) किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.