हा धक्कादायक प्रकार 2 मार्च रोजी घडला. रुग्णालयात 2 मार्चला हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या आवाजात गाणी लावून डान्स केला. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला काही दिवसांपूर्वी हळदी-कुंकवाच्या या व्हिडीओसह तक्रार मिळाली होती. त्यानंतर महापालिकेने आता या व्हिडीओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयातील सुमारे 20 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. यामध्ये डॉक्टर, नर्स आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दिवालीबेन मेहता रुग्णालयात दररोज 700 ते 800 रुग्णांची तपासणी केली जाते. मात्र हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमामुळे फक्त 377 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारांशिवायच परत जावं लागलं. महत्त्वाचं म्हणजे हे रुग्णालय सायलन्स झोन येतं. तरीही तिथे मोठ्या आवाजात गाणी लावून डान्स केला जात होता.
पाहा व्हिडीओ