रावतेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्याचा पश्चाताप नाही : हाजी अराफत
एबीपी माझा वेब टीम | 17 Aug 2017 11:37 PM (IST)
जे मनात होतं, तेच बोललो, वेगळं काहीही बोललो नाही, मी पक्ष सोडत नाही, असंही हाजी अराफत यांनी स्पष्ट केलं
मुंबई : शिवसेनेच्याच कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावतेंचे वाभाडे काढणारे शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. या वक्तव्याचा कोणताही पश्चाताप होत नसल्याचं अराफत यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना म्हटलं आहे. जे मनात होतं, तेच बोललो, वेगळं काहीही बोललो नाही, मी पक्ष सोडत नाही, असंही हाजी अराफत यांनी स्पष्ट केलं. माझ्याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, माझी-त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर काय होतंय ते बघू. मी फार जुना कार्यकर्ता आहे, माझ्यासोबत आलेले अनेक जण पक्ष सोडून गेले, असंही ते म्हणाले. मी भावनिक होऊन बोललो, असं काही ठरवून बोललो नाही, असंही हाजी अराफत शेख यांनी सांगितलं.