मरिन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसलेल्या विद्यार्थिनीचा समुद्रात बुडून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2017 12:11 PM (IST)
मुंबई : मुंबईत समुद्रातील भरतीच्या वेळी मरिन ड्राइव्हवर बसलेल्या तरुणीचा बुडून मृत्यू झाला आहे. 17 वर्षीय प्रिती श्रीकृष्ण पिसेला समुद्रात बुडून जीव गमवावा लागला. प्रिती कॉलेजमधील मित्र मैत्रिणींसोबत मरिन ड्राईव्हवर फिरायला आली होती. दुपारी भरतीची वेळ असताना ती कट्ट्यावर बसली होती. त्यावेळी भरतीची मोठी लाट आली आणि त्यामुळे ती समुद्राकडे खेचली गेली. मरिन ड्राइव्ह पोलिसांच्या लक्षात येताच तातडीनं तिला वाचवण्याचे प्रयत्न झाले, मात्र तिला वाचवण्यात यश आलं नाही. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर प्रितीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पावसाळ्यात भरतीच्या वेळी समुद्राजवळ जाऊ नका, असं आवाहन वारंवार मुंबई पोलिस आणि प्रशासनाकडे केलं जातं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं.