मुंबई : मुंबईत एका 22 वर्षीय तरुणीने धावत्या लोकलसमोर उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ही तरुणी दोन्ही रुळांच्या गॅपमध्ये पडल्याने सुरक्षित राहिली.


अंधेरी स्टेशनवर शनिवारी दुपारी घडलेली ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फ्लॅटफॉर्मवर असताना फोनवर बॉयफ्रेण्डसोबत वाद झाल्यानंतर तिने थेट धावत्या लोकलसमोर उडी मारलीस, असं म्हटलं जात आहे.

तरुणीने उडी मारल्यानंतर लोकांनी आरडाओरड सुरु केली. त्यामुळे मोटरमनने तात्काळ ब्रेक दाबून लोकल थांबवली. पण तोपर्यंत लोकलचे तीन डब्बे तिच्यावरुन गेले होते.

दोन्ही रुळांच्या गॅपमध्ये पडल्याने ती बचावली. पोलिसांनी तिला उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांच्या माहितीनुसार, तरुणीच्या घोट्याला, तसंच पाठ आणि पोटाला किरकोळ दुखापत झाली आहे, मात्र तिला गंभीर जखमा नाहीत.

पाहा व्हिडीओ