Mumbai Kandivli Fire: मुंबईच्या कांदिवली परिसरात बुधवारी सकाळी सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या सगळ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक माहितीनुसार, कांदिवली पूर्वेला असणाऱ्या मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत बुधवारी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास गॅसचा पाईप लीक (Gas Leakage) झाल्यामुळे हा स्फोट (Mumbai Gas blast) झाला. या स्फोटानंतर घटनास्थळी आग लागली. मुंबई अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग ग्राउंड +१ मजल्याच्या दुकानात लागली होती. यात वीजजोडणी, एलपीजी गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, गॅस स्टोव्ह यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. आगीत सात जण भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर ईएसआयसी रुग्णालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींपैकी बहुतांश जण 85 ते 90 टक्के भाजले आहेत.  (Mumbai Fire news)

स्फोटात जखमी झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे

1. शिवानी गांधी (वय 51) (ESIC रुग्णालय)- 70 टक्के भाजल्या आहेत.

2. नितू गुप्ता (वय 31) (ESIC रुग्णालय)- 80 टक्के भाजल्या आहेत.

3. जानकी गुप्ता (वय 39) (ESIC रुग्णालय)- 70 टक्के भाजल्या आहेत.

4. मनराम कुमाकट ( वय 55) (ESIC रुग्णालय)- 40 टक्के भाजले आहेत.

5. रसिका जोशी (वय 47) (डॉ. आंबेडकर रुग्णालय)- 90 टक्के भाजल्या आहेत.

6. दुर्गा गुप्ता (वय 30) (डॉ. आंबेडकर रुग्णालय)- 90 टक्के भाजल्या आहेत.

7. पुनम (वय 28) (डॉ. आंबेडकर रुग्णालय)- 90 टक्के भाजल्या आहेत.

आणखी वाचा

मुंबईतील क्राईम मिस्ट्री उलगडली, भांडणावेळी ढकललं, काचेवर पडून नसा कापल्या, पत्नी अन् मुलानेच पोलीस हवालदाराचा घात केला

मुंबई पुन्हा एकदा हादरली, अंधेरीत मुलानेच वडील अन् आजोबांना संपवलं; नेमकं काय घडलं?