एक्स्प्लोर

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल पाडकामाला स्थानिकांचा विरोध, जोरदार घोषणाबाजी करत 'पूल बंद'चा बोर्ड काढून फेकला

Mumbai Elphinstone Bridge Protest : स्थानिकांनी जोरदार विरोध करत एल्फिन्स्टन पूल पाडकामाचं काम बंद केलं. रहिवाशांचे पुनर्वसन केल्यानंतरच या कामाला सुरुवात करण्याची मागणी स्थानिकांनी केली. 

मुंबई: प्रभादेवी आणि परळ या परिसरांना जोडणारा एल्फिन्स्टन पूल बंद करण्याविरोधात स्थानिक आक्रमक (Elphinstone Bridge Protest ) झाल्याचं दिसून आलं. पोलिसांकडून एल्फिन्स्टन पूल बंद करण्यापूर्वी बॅरिकेटिंग करण्यात येतं होतं. यावेळी स्थानिकांनी जोरदार घोषणाबाजी करत काम बंद पाडलं. इथं असलेला 'पूल बंद'चा फलक या आंदोलकांनी काढून टाकला. एल्फिन्स्टन जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आधी सोडवला गेला पाहिजे. तसेच पूर्व पश्चिम जाण्यासाठी पादचारी पुलाचे काम आधी पूर्ण करा मगच हा पूल पूर्णतः बंद करा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. 

शिवडी ते वरळी कनेक्टरसाठी जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल बंद (Elphinstone Bridge Closed ) ठेवण्यात येणार आहे. पण स्थानिकांनी मात्र त्याच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. हा रस्ता बंद केल्यास आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा स्थानिकांकडून देण्यात येत आहे.

या ठिकाणी पिढ्यानपिढ्या अनेक कुटुंब राहतात. त्यांचे पुनर्वसन न करताच हा पूल पाडण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. 

स्थानिकांना विश्वासात न घेताच काम सुरू

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची स्थानिकांना विश्वास न घेताच कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिकांकडून जोरदार विरोध केल्यानंतर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पॉटवरुनच फोनाफोनी सुरु केली. पुनर्वसनाचा प्रश्न विचार न घेतल्याने स्थानिक रहिवाशांना उत्तरे देतांना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाल्याचं दिसून आलं. 

एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद

प्रभादेवी आणि परळ या परिसरांना जोडणारा मुंबईतला ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल 25 एप्रिलच्या रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुंबईतला एल्फिन्स्टन पूल हा तब्बल 112 वर्षे जुना आहे. त्यामुळं मुंबई आणि त्यातही एका जमान्यातल्या गिरणगावाच्या अनेक आठवणी या पूलशी जुळलेल्या आहेत. 

एमएमआरडीएकडून हा जुना पूल पाडून, त्याजागी नवीन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी उन्नत पुलाचं काम करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून हरकती मागवून एल्फिन्स्टन पूल आज रात्री नऊ वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

उपाययोजना काय - 

1. दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी टिळक पूलचा वापर करण्याच्या सूचना.
2. लोअर परळ, प्रभदेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या करी रोड पूलचा वापर करण्याच्या सूचना.
3. भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड, सी लिंककडे जाण्यासाठी चिंचपोकळी पूल किंवा एस पूलचा वापर करण्याच्या सूचना.

एलफिस्टन पूल बंद केल्यानंतर पाडकाम कसे करण्यात येईल?

  • एलफिस्टन पूलच्या दोन्ही बाजूचे उतार तोडण्याचे काम एमएमआरडीए करणार आहे, तर रेल्वेच्यावर जो लोखंडी भाग आहे तो तोडण्यासाठी महारेल कंपनीला कंत्राट आले आहे. 
  • रेल्वेचा भाग सोडून इतर भाग तोडण्यासाठी 30 मे पर्यंतची डेडलाईन ठेवण्यात आली आहे.
  • मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वर जो लोखंडी पुलाचा भाग आहे तो तोडून बाजूला करण्यासाठी 10 जुलैपर्यंत डेडलाईन ठेवण्यात आले आहे. 
  • आज रात्री पूल बंद केल्यानंतर पुढचे तीन ते चार दिवस या पूलवरील युटिलिटी केबल्स आणि इतर कमी वजनाचे साहित्य बाजूला करण्यात येईल. 
  • त्यानंतर लोखंडी पुलावर असलेला डांबर आणि सिमेंटचा रस्ता हा पूर्णपणे खोदण्यात येईल आणि फक्त लोखंडी पुलाचा भाग ठेवण्यात येईल.
  • गॅस कटरच्या साह्याने लोखंडी पूल कापण्यात येईल आणि त्याचे वेगवेगळे तुकडे हे क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात येतील.
  • मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे मार्गावरील लोखंडी पुलाचा भाग बाजूला करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येतील.
  • 800 मेगा टन क्षमतेच्या क्रेनच्या सहाय्याने हे भाग बाजूला करण्यात येतील, त्याचप्रमाणे 500 मेगाटन क्षमतेची क्रेन देखील मदतीसाठी असेल. 
  • पूल तोडण्यासाठी दोन पोकलेन वापरण्यात येतील, तर पूल तोडल्यानंतर त्याचे वेगवेगळे भाग आणि दगड वाहतुकीसाठी दहा डंपरची व्यवस्था करण्यात आली आहे.
Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup Prize Money: T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
भारत -न्यूझीलंड T20 विश्वचषक अंतिम सामन्याची उत्सुकता शिगेला! जिंकणाऱ्या संघाला किती कोटी? पराभूत संघालाही भरघोस बक्षीस
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Maharashtra Live blog updates: भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचं किल्ले शिवनेरीवरून वादग्रस्त विधान
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
Embed widget