एक्स्प्लोर

Elphinstone Bridge Close : एल्फिन्स्टन पूल दोन वर्षांसाठी बंद राहणार, हरकती न आल्यास 15 एप्रिलपासून वाहतूक बंद; 'असे' आहेत पर्यायी मार्ग

Elphinstone Bridge Close : एल्फिन्स्टन पुलाच्या पुर्नबांधणीचे काम सुरू होणार असून दोन वर्षे हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी 13 एप्रिलपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत.

मुंबई : होऊ घातलेल्या वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पुलाची पुर्नबांधणी करण्यात येणार असून त्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी दोन वर्षे बंद ठेवण्यात येणार आहे. जुना ब्रिज तोडून त्या ठिकाणी डबल डेकर ब्रिजची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार आहे.  एल्फिन्स्टन पूल बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी हरकतीमागवल्या आहेत. 

एल्फिन्स्टन पूल हा दोन वर्षांसाठी बंद केला जाणार असून त्यानुसार वाहतुकीत बदलही करण्यात येणार आहेत. या पुनर्बांधणीच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार असल्याने पुलाच्या नियोजित पाडकामासाठी 13 एप्रिलपर्यंत सूचना-हरकती मागवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी 13 एप्रिलपर्यंत हरकती न घेतल्यास 15 एप्रिलपर्यंत वाहतूक बंद करून पाडकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. 

वाहतूक पोलिसांनी सूचवलेले वाहतुकीतले बदल 

- वाहने मडके बुवा चौक (परळ टर्मिनस जंक्शन) पासून उजवीकडे वळतील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने जातील. तसेच खोडादाद सर्कल (दादर टीटी जंक्शन) पासून डावीकडे टिळक ब्रिजमार्गे इच्छित स्थळी वाहनांना पोहचता येईल. 

- वाहने मडके बुवा चौकापासून (परळ टी.टी. जंक्शन) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडमार्गे थेट कृष्णा नगर जंक्शन, परळ वर्कशॉप, सुपारी बाग जंक्शन आणि भारत माता जंक्शन मार्गे पुढे जातील. तेथून, महादेव पालव रोडवर उजवीकडे वळून, करी रोड रेल्वे ब्रिज ओलांडून, आणि नंतर शिंगटे मास्टर चौकातून उजवीकडे वळून लोअर परळ ब्रिजवर पोहोचतील.

- खोडादाद सर्कल (दादर टीटी जंक्शन) पासून वाहने उजवीकडे वळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड मार्गे टिळक ब्रिजकडे जातील.

- वाहने संत रोहिदास चौक (एल्फिन्स्टन जंक्शन) येथून सरळ जातील, वडाचा नाका जंक्शनपासून डावीकडे वळून लोअर परेल ब्रिजमार्गे पुढे जातील. शिंगटे मास्टर चौक येथे डावीकडे वळण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. डावीकडे वळून महादेव पालव रोड आणि करी रोड रेल्वे ब्रिज मार्गे गंतव्यस्थानावर पोहोचता येईल.

- वाहने संत रोहिदास चौक (एल्फिन्स्टन जंक्शन) पासून सरळ जातील, वडाचा नाका जंक्शन येथे डावीकडे वळतील. शिंगटे मास्टर चौक येथे पोहोचण्यासाठी याच मार्गाने वाहने लोअर परेल ब्रिजमार्गे पुढे जातील. त्यानंतर, वाहने महादेव पालव रोडवर डावीकडे वळतील आणि करी रोड रेल्वे ब्रिजमार्गे भारतमाता जंक्शनकडे जातील.

- महादेव पालव रोड (करी रोड रेल्वे ब्रिज) हा कॉम्रेड कृष्णा देसाई चौक (भारत माता जंक्शन) पासून शिंगटे मास्टर चौकापर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि विरुद्ध दिशेने दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत एक दिशा वाहतूक खुली राहील. दोन्ही दिशा रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुल्या राहतील.

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! मुंबईतील भायखळा परिसरात गोळीबार; एक जण जखमी, हल्लेखोर पसार, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! मुंबईतील निवासी डॉक्टरने संपवलं जीवन, मानसिक तणावात असल्याची माहिती
धक्कादायक! मुंबईतील निवासी डॉक्टरने संपवलं जीवन, मानसिक तणावात असल्याची माहिती
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
...बाकी ज्ञान कशाला पाजळत बसता? मुंबईतील 25 वाहनांच्या ताफ्यावरुन रोहित पवार-अमित साटम यांच्यात जुंपली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget