मुंबई : पुढच्या 20 वर्षांसाठीचा मुंबईच्या विकास आराखड्याचा अंतिम अहवाल महापौरांसमोर सादर करण्यात आला. मुंबईकरांना परवडणारी घरं मिळवून देण्यासोबतच परवडणाऱ्या भाड्यातही घरं घेता यावीत, यासाठी या अहवालात तरतूद करण्यात आली आहे.


परवडणाऱ्या घरांसाठी मोकळ्या जागा, नाविकास क्षेत्र आणि बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जागेचा वापर केला जाईल. त्याशिवाय, आरे वसाहतीसाठीही महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत.

विकास आराखड्याच्या अंतिम अहवालातील तरतुदी :

  • अहवालात परवडणाऱ्या घरांची सुधारित व्याख्या

  • केंद्राच्या परवडणाऱ्या घरात भाड्याच्या घराचाही समावेश

  • 787 हेक्टर क्षेत्रफळावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती

  • परवडणाऱ्या घरांसाठी मोकळ्या जागा, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा वापर

  • परवडणाऱ्या घरांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टची 55 हेक्टर जागा

  • एसआरए प्रकल्पांना पर्याय देण्याची तरतूद

  • मोकळ्या जागेसाठी 4 हजार 820 हेक्टरची तरतूद