Mumbai Dam Water Storage: मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ( Dam Water Storage) झपाट्याने घटत असल्याने आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सध्या या धरणांमध्ये सरासरी केवळ 37.70 टक्के जलसाठा शिल्लक असून, वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे.

Continues below advertisement

Mumbai Dam Water Storage:  पाणीसाठ्याची सद्यस्थिती

मुंबईची तहान भागवणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांतील पाणी पातळी खाली जात आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण 5,45,680 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक आहे. मुंबईला दररोज सुमारे 4,000 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. जूनअखेरपर्यंत हा साठा पुरवणे हे पालिकेसमोर मोठे आव्हान असणार आहे.

Mumbai Dam Water Storage: धरणांमधील पाणीसाठा (टक्केवारीनुसार):

विहार: 48 टक्के

Continues below advertisement

तुळशी: 43.67 टक्के

उर्ध्व वैतरणा: 40.35 टक्के

तानसा: 39.17 टक्के

भातसा: 37.93 टक्के

मोडकसागर: 34.55 टक्के

मध्य वैतरणा: 32.96 टक्के

Mumbai Dam Water Storage: गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत साठा अधिक, पण...

आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत (5 एप्रिल 2025 रोजी 4.11 लाख दशलक्ष लिटर आणि 5 एप्रिल 2024 रोजी 4.13 लाख दशलक्ष लिटर) यंदाचा साठा काहीसा समाधानकारक असला, तरी उन्हाची वाढती तीव्रता चिंतेचा विषय ठरत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, पावसाळा लांबणीवर पडल्यास मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

Mumbai Dam Water Storage: प्रशासकीय हालचाली आणि आदेश

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पाणी गळती रोखणे आणि दूषित पाण्याच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पाण्याचा साठा जपून वापरण्यासाठी पर्यायी नियोजन करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. येत्या काळात पाण्याची उपलब्धता लक्षात घेता, मुंबई महापालिकेने सर्व नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Rajya Sabha Oath: शरद पवार, ज्योती वाघमारे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार; पाहा नवनिर्वाचित सदस्यांची यादी!

Ashok Kharat Case Nashik Crime News: महिलांचे आधार-पॅनकार्ड घेऊन अशोक खरात काय करायचा?; मोबाईल चॅट, व्हॉइस नोट्स आणि ऑडिओ क्लिप्समधून धक्कादायक माहिती