Continues below advertisement

Dadar Kabutar Khana : मुंबई महानगरपालिकेने (BMC) अखेर कबुतरखान्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद असलेल्या कबुतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने चार नवीन ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास (controlled feeding) परवानगी दिली आहे. या ठिकाणी फक्त सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना दाणे देता येतील.

स्वयंसेवी संस्थांना जबाबदारी स्वीकारुन या कबुतरखान्याचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. तसेच तज्ज्ञ समिती अहवाल आणि न्यायालयाचे आदेश प्राप्त होईपर्यंत ही अंतरिम व्यवस्था राहणार असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत सध्या बंद करण्यात आलेले कबुतरखाने सुरु करण्यास परवानगी दिलेली नाही, ते बंदच राहणार असंही महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

Continues below advertisement

Mumbai Kabutarkhana News : कोणत्या ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकण्यास परवानगी?

1. वरळी जलाशय (Worli Reservoir)

2. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोडवरील खारफुटी परिसर

3. ऐरोली-मुलुंड जकात नाका परिसर

4. बोरिवली पश्चिमेतील गोराई मैदान

NGO Responsibility for Management : स्वयंसेवी संस्थांची जबाबदारी

या चारही ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याचे काम स्वयंसेवी संस्थांकडे (NGOs) सोपवले जाणार आहे. परवानगी मिळण्यासाठी संस्थांनी कबुतरखान्याचे संपूर्ण व्यवस्थापन, परिसराची स्वच्छता, नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई आणि आरोग्याविषयी जनजागृती याची जबाबदारी घ्यावी लागेल.

संस्थेकडून यासंबंधी प्रतिज्ञापत्र (Affidavit) घेतले जाईल. तसेच संबंधित प्रशासकीय विभागांचे सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioners) हे या ठिकाणांचे समन्वय अधिकारी (Nodal Officers) म्हणून नियुक्त केले जातील.

Public Feedback On Kabutar Khana : नागरिकांकडून तब्बल 9,779 सूचना

महानगरपालिकेकडे कबुतरखान्यांबाबत नागरिकांकडून 9,779 सूचना आणि हरकती (Objections and Suggestions) प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कबुतरखाने कायम ठेवणे, बंद करणे, स्वच्छता राखणे आणि कंट्रोल्ड फीडिंग या सर्व बाबींचा समावेश आहे.

Interim Arrangement till Court Report : न्यायालयाचा अहवाल येईपर्यंत अंतरिम व्यवस्था

तज्ज्ञ समितीचा अहवाल आणि माननीय न्यायालयाचे अंतिम आदेश मिळेपर्यंत ही व्यवस्था तात्पुरती (Interim) स्वरूपात लागू राहील. त्यामुळे विद्यमान कबुतरखाने सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. महानगरपालिकेने (BMC) स्पष्ट केलं आहे की या निर्णयाचा उद्देश कबुतरांना अन्न मिळावं, पण सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या टाळाव्यात, हा आहे.

ही बातमी वाचा: