मुंबई : मुंबईतल्या दादरमधल्या (Mumbai Dadar) भरतक्षेत्र (Bharatkshetra) या साडीच्या दुकानावर काल ईडीनं (ED) धाड घालून कसून चौकशी केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या धाडीनंतर भरतक्षेत्र दुकानात तब्बल 12 ते 13 तास चौकशी केल्याची माहिती आहे. याप्रकरणी 15 लाख रुपये कॅश जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आर्थिक अफरातफर (Money Laundering) प्रकरणात ही धाड टाकली आहे.
मुंबईचा दादर येथील प्रसिद्ध साडीचे दुकान भरतक्षेत्र आणि त्याच्या मालक मनसुखलाल गालाच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यात तब्बल 15 लाख रुपयांची कॅश जप्त झाल्याचे आता समोर आला आहे. बुधवारी सकाळी ईडीने भरतक्षेत्रचे मालक मनसुख गाला त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट आणि इतरांच्या एकूण पाच ठिकाणांवर छापे टाकले होते. तब्बल 12 तास हे सर्च ऑपरेशन सुरू होते. 2019 साली बांधकाम व्यवसायिक अरविंद शहा यांच्या तक्रारीवर दाखल झालेल्या फसवणूक आणि फॉर्जरीच्या प्रकरणात हे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
113 कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण
बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत शहा आणि गाला हे दोघे भागीदार असून गालाने बेकायदेशीररित्या शहांच्या कुटुंबाचे कंपनीतील 50% भाग 25 टक्क्यावर आणल्याचा शहांचा आरोप आहे. ज्यामुळे त्यांना तब्बल 133 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी मनी लॉन्ड्रीच्या अनुषंगाने ईडी तपास करते. भरतक्षेत्रचे मालक मनसुखलाल गाला यांच्यावर 2019 साली आर्थिक घोटाळ्यासंदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला होता. याच तक्रारीच्या आधारे ईडी चौकशी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
चार ते पाच दिवसांपासून चौकशी
दादरमधील भरतक्षेत्र हे दुकान साड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. या दुकानावर धाड पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने भरतक्षेत्र साडी व्यापाऱ्यावर कारवाई केली आहे. बुधवारी ईडीचे अधिकारी या दुकानात दाखल झाले होते. अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दस्तावेज व कागदपत्र ताब्यात घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याची देखील माहिती समोर येत आहे. अद्याप या प्रकरणी ईडीकडून किंवा भरतक्षेत्र आणि त्यांचे मालक मनसुखलाल गाला यांच्यकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
हे ही वाचा :