मुंबई: गुन्हे अन्वेषण विभागाचे (क्राइम ब्रांच) अधिकारी असल्याचा बनाव करत मनी लॉन्ड्रिंगच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन सायबर भामट्यांनी (Mumbai Crime News) एका निवृत्त वरिष्ठ तंत्रज्ञाची २४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवून आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा व बनावट ओळखपत्राचा वापर करून हा प्रकार घडवून आणण्यात आला. याप्रकरणी पूर्व विभाग सायबर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.(Mumbai Crime News)

Continues below advertisement

अणूशक्तीनगर येथील बीएआरसी (BARC) कॉलनीत राहणारे ६१ वर्षीय तक्रारदार हे ३१ ऑगस्ट रोजी वरिष्ठ तंत्रज्ञ पदावरून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर अवघ्या दहा दिवसांत, म्हणजेच १० सप्टेंबर रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. "तुमच्या नावावर नाशिकमध्ये बँक खाते उघडण्यात आले असून त्यातून २ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत," असे सांगून आरोपींनी त्यांना घाबरवले. तसेच 'ओएमआर सलाम' नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.(Mumbai Crime News)

Mumbai Crime News: व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल, ईडीची बनावट नोटीस आणि ‘डिजिटल अरेस्ट’

तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी 'प्रदीप जयस्वाल' नावाच्या कथित वरिष्ठ अधिकाऱ्याशी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरून संभाषण घडवून आणले. या कॉलदरम्यान जयस्वालच्या पाठीमागे 'मुंबई पोलीस'चा लोगो दिसत होता. "तुमच्या नावे अटक वॉरंट निघाले आहे, मात्र सहकार्य केल्यास यातून मार्ग काढता येईल," असे सांगून त्याला घरातच 'डिजिटल अरेस्ट' ठेवण्यात आले.

Continues below advertisement

१२ ते १५ सप्टेंबर दरम्यान आरोपींनी सतत व्हॉट्सॲप कॉल करून तक्रारदाराला घराबाहेर न पडण्याचे, स्थानिक पोलिसांशी संपर्क न साधण्याचे आणि प्रत्येक तासाला आपल्या हालचालींची माहिती देण्याचे बंधन घातले. इतकेच नव्हे तर, अंमलबजावणी संचालनालयाची (ED) बनावट नोटीस पाठवून या प्रकरणात गळती मिळवण्यासाठी २४ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली.(Mumbai Crime News)

Mumbai Crime News: आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा बनाव

१६ सप्टेंबर रोजी आरोपी 'जयस्वाल'ने स्वतः आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील बोलत असल्याचे भासवले आणि व्हॉट्सॲपवर त्यांच्या नावाचे बनावट ओळखपत्र पाठवले. या दबावाला बळी पडत तक्रारदाराने आरोपींनी दिलेल्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २४ लाख ८० हजार रुपये वर्ग केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.