Mumbai Crime: मुंबईत एका तरुणीने आपल्या प्रियकराच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. 8 मार्च रोजी या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide News) केली होती. ही तरुणी डॉक्टर (Doctor) असून तिचे नाव स्तुती बजरंग सोनावणे असे होते. मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाणे यांनी डॉ. स्तुती बजरंग सोनावणे (Stuti Sonawane) या तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान (31) याला लोअर परळ (Lower Parel) येथून अटक केली. न्यायालयाने फजल मोहम्मद खान याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आत्महत्या (Mumbai Crime News) केलेल्या तरूणीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितलं की, स्तुतीही मानसिक तणावात होती हे तिने कधी दाखवले नाही. ती हुशार होती अभ्यासू होती. त्या रात्री ती अभ्यासासाठी तिच्या खोलीत गेली होती, त्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र ती ज्या गोष्टींमुळे मानसिक तणावात होती त्याबाबत तिने आम्हाला कधीच सांगितलं नाही. सांगितलं असतं तर आम्ही त्यातून मार्ग काढला असता आता माध्यमातून चुकीच्या पद्धतीने गोष्टी दाखवल्या जात आहेत. माझी पोलिसांकडून अपेक्षा आहे मुख्य आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया स्तुतीचे वडिल बजरंग सोनावणे यांनी दिली आहे.(Mumbai Crime News)

Continues below advertisement

तिच्या घरी सुसाइड नोट सापडली

तर अँटॉप हिल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी पावडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, निर्मलनगर सोसायटीत स्तुती सोनावणे हिने आत्महत्या केली. या प्रकरणी आम्ही अपमृत्यूची नोंद केली आहे. तिच्या घरी सुसाइड नोट सापडली यात फजल मोहम्मद खान (31) या मित्राने चारित्राविषयी प्रश्न उपस्थित केले होते. यातून मानसिक तणावाचा तिने आत्महत्या केली. ⁠या प्रकरणी खान याला अटक केली असून न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. ⁠मुलीच्या कुटुंबियांशी संवाद साधत आहोत. आत्महत्येचा दिवशी कुटुंबीय जेवून बाहेरून आल्यानंतर झोपले होते. मुलगी तिच्या खोलीत होती. सकाळी मुलगी रुममधून प्रतिसाद देत नव्हती. वडिलांनी दरवाजा तोडल्यानंतर मुलीने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले, ⁠सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली होती, २०२४ मध्ये मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. खान याने तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, अँटॉप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत.(Mumbai Crime News)

ओळख एका डेटिंग अ‍ॅपवरुन झाली

तर मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. स्तुती सोनावणेच्या आत्महत्येमुळे मुंबई (Mumbai News) परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनास्थळावरून सहा पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यात फैजल मोहम्मद खानकडून सतत मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख आहे. फजलच्या छळाची माहिती स्तुतीने आपल्या मैत्रिणीला दिली होती. त्यात तिने “तू एक दिवस फ्रिज मध्ये सापडशील” असे वारंवार म्हणायचा, असे सांगितले होते. स्तुती सोनावणे आणि फजल खान यांची ओळख एका डेटिंग अ‍ॅपवरुन झाली. त्यानंतर ते गेल्या वर्षभरापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, या दोघांमध्ये भांडणे व्हायची. त्यावेळी फजल खान तिला मारुन टाकण्याची धमकी द्यायचा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Continues below advertisement

या सगळ्या त्रासाला कंटाळून डॉ. स्तुती सोनावणे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 8 मार्च रोजी स्तुतीच्या वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला असता स्तुतीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करुन स्तुती सोनावणे हिचा मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालानुसार डॉ. स्तुती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत.