एक्स्प्लोर

Mumbai Crime News: मुंबई एअरपोर्टवरच्या टॉयलेटमधील कचऱ्याच्या डब्यात सापडलं मृत अर्भक, विमानतळावर एकच खळबळ

Mumbai Crime News: दौंडनंतर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळातील शौचालयाच्या कचऱ्याच्या डब्यात मृत अर्भक सापडलं आहे.

मुंबई: एकीकडे पुण्यातील दौंड शहरामध्ये एका बरणीमध्ये अर्भक आणि शरिराचे अवयव कचाऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये आढळल्याने खळबळ उडाली या घटनेचा तपास पोलिस करत आहेत, अशातच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या एका शौचालयाच्या कचऱ्याच्या डब्यात मृत अर्भक सापडल्यामुळे खळबळ उडाली. काल (मंगळवारी ता, 25 मार्च) रात्री हा प्रकार समोर आला आहे. अर्भकाला कोणीतरी कचऱ्याच्या डब्यात फेकून गेले आहे.

बाळ रडत असताना लोकांच्या लक्षात आलं आणि पोलिसांना कळवण्यात आले होते. पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे. हे एक दिवसीय बाळ मृत असल्याची माहितीही समोर आली आहे. सहार पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. आजूबाजूला असलेल्या CCTV मार्फत पोलीस आरोपीच्या शोध घेत आहेत. हे 1 दिवसाचे मृत अर्भक आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला असून, विमानतळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार कोणीतरी बाळाला तेथे टाकून निघून गेले असावे. त्याचा मागोवा घेण्यासाठी विविध ठिकाणी चौकशी सुरू आहे. बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील रुग्णालये, महिलांसाठी असलेली निवासस्थाने तसेच विमानतळावरून प्रवास करणाऱ्या लोकांची माहिती तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच मुंबईतील अनाथालये आणि सामाजिक संस्थांकडूनही माहिती घेतली जात आहे.

दौंडमध्ये कचराकुंडीत बरणीमध्ये अर्भक अन् अवयव

दौंड शहरातील कचराकुंडीमध्ये अर्भक आणि मानवी शरीराचे अवयव आढळल्याने परिसरामध्ये काल (मंगळवारी) मोठी खळबळ उडाली. बोरावके नगरमध्ये प्राइम टाऊन हॉटेलच्या मागे असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एका बरणीमध्ये एक मृत अर्भक आणि अवयवांच्या बरण्या एका नागरिकाला आढळल्या. त्यांनी तातडीने पोलिसांना संबंधित माहिती दिली आहे. पोलिसांनी पंचनामा करत रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. 

कचराकुंडीत बॉक्समध्ये एका बाटलीत एक पुरुष जातीचे अर्भक होते, तर अन्य 11 बरण्यांमध्ये मानवी शरीराचे अवशेष होते, अशी माहिती समोर आली आहे. सापडलेल्या बॉक्सवर भंगाळे हॉस्पिटलचा उल्लेख असल्याने पोलिसांनी डॉक्टरांकडे चौकशी केली. अकरा बरण्यांमध्ये ऑपरेशन झाल्यानंतरचे अवयव ठेवल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्या बरण्यांवर रुग्णांची नावेही होती. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संदीप गुजर यांनी संबंधित बरण्या आणि त्यातील अवयवांची तपासणी केली. त्यात पुरुष जातीचे अर्भक असल्याचे पुढे आले. तसेच, रुग्णालयातील डॉक्टरांनी इतर अकरा बरण्यांवर असलेल्या रुग्णांच्या नावांच्या कागदपत्रांची फाइल पोलिसांना सादर केली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget