मुंबई : मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात दुभाजकावर खुल्लम खुल्ला प्यार करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. परदेशी नागरिकाला चौकशी करुन सोडून देण्यात आलं, तर महिलेची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

एरव्ही खुलेआम मरिन ड्राईव्हच्या कट्ट्यावर दिसणारी प्रेमी युगुलं पावसाळा म्हटला की छत्रीआड गेलेली पाहायला मिळतात. मात्र गुरुवारी दिवसाढवळ्या एका जोडप्यानं कहरच केला.

संबंधित महिला एका परदेशी नागरिकासोबत दिवसाढवळ्या सदैव ट्राफिकनं व्यस्त असलेल्या क्वीन्स नेकलेसच्या रोडवर मध्यभागी आक्षेपार्ह अवस्थेत आढळली होती.

एरव्ही प्रेमी युगुलांना वळून वळून न्याहळणारी आपली पब्लिक गोळा झाली नसती तरच नवल. अनेकांनी यांचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे हा व्हिडिओही व्हायरल झाला.

या घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेली पोलीस व्हॅन तिथं दाखल झाली. पोलिसांना पाहताच स्वत:ला सावरत त्यांनी तिथून काढता पाय घेतला. त्या महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला आपण दोघं गोव्यातून आल्याचं तिनं सांगितलं. मात्र आपला पत्ता किंवा नातेवाईकांचा फोन नंबर सांगण्यास ती टाळाटाळ करु लागली.

मरिन ड्राईव्ह पोलिस स्थानकात अधिक चौकशी केली असता मानसिक स्वास्थ्य गमावलेल्या त्या महिलेनं काहीही बरळण्यास सुरुवात केली. अखेरीस पोलीसांनी शुक्रवारी सकाळी तिची रवानगी चेंबूरच्या महिला सुधारगृहात केली.

पाहा व्हिडिओ :