Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सोमवारी 26 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत 18 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 10 लाख 38 हजार 569 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईत आतापर्यंत पाच हजार 235 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 313 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 26 रुग्णांपैकी एकाही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हणजेच, आज आढळलेले सर्व रुग्णांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 151 बेड्सपैकी केवळ 18 बेड सध्या वापरात आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा कालावधी 17 हजार 101 दिवसांवर पोहचला आहे.
राज्याला मोठा दिलासा, सोमवारी 41 कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू
सोमवारी राज्यात केवळ 41 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 732 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 41 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 87 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज शून्य कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 663 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 97, 05, 301 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. राज्यात सध्या 732 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 313 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 52 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.