मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचे आफ्टर इफेक्ट दिसू लागले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कालच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या 147 ने वाढली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 514 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 604 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.


मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4602 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1277 दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या 37 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत. 






 


राज्यात आज  3,783 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


राज्यात आज  3,783 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 364  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 17 हजार 070  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के आहे. राज्यात आज 56 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 49 हजार 034 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,258 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  


देशात गेल्या 24 तासांत 27,176 नव्या कोरोना रुग्णांची नोंद


देशात सलग 80व्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा 50 हजारांहून कमी आला आहे. बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 27,176 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 284 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,012 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.