Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी मुंबईत 506 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी सतरा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मंगळवारी 218 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 218 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 2526 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,43,710 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 2355 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.029% टक्के इतका आहे.






सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 2526 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 297 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 413 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 17, रायगड 83, पालघर 29, रत्नागिरी 15 आणि नागपूरमध्ये 21 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात मंगळवारी 711 रुग्णांची नोंद


 महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मास्कची देखील सक्ती नाही.कोरोना संपलाय, अशी आशा बाळगत असाल तर आज राज्याची चिंता वाढवणारी  माहिती  समोर आली आहे.  राज्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मंगळवारी  राज्यात 711 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 366 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 338 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : चिंता वाढली! राज्यात मंगळवारी 711 रुग्णांची नोंद तर 366 रुग्ण कोरोनामुक्त


Monkeypox Guidelines : मंकीपॉक्सच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे  जारी