Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना (Corona) रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आज मुंबईत 383 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 383 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 97 हजार 202 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 625 झाली आहे. सध्या मुंबईत 3,006 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 383 रुग्णांमध्ये 362 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 1645 दिवसांवर गेला आहे.


सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत


राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 3006 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 6222 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 1700 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 294, रायगड 594, रत्नागिरी 84, सिंधुदुर्ग 55, सातारा 277, सांगली 114, कोल्हापूर 97, सोलापूर 283, नाशिक 557, अहमदनगर 301, जळगाव 73, धुळे 85, औरंगाबाद 406, जालना 358, बीड 25, लातूर 147, नांदेड 29, उस्मानाबाद 142, अमरावती 115, अकोला 129, वाशिम 304, बुलढाणा 169, यवतमाळ 72, नागपूर 922, वर्धा 48, भंडारा 116, गडचिरोली 41 आणि चंद्रपूरमध्ये 75 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 16922 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात 2575 नवे कोरोनाबाधित


राज्यात बुधवारी तीन हजार 210 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोन हजार 575 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 10 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.


संबंधित बातम्या


Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारी 420 रुग्णांची नोंद, 659 कोरोनामुक्त


India Coronavirus Cases : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच; गेल्या 24 तासांत 16906 नवे रुग्ण, 45 जणांचा मृत्यू