Maharashtra Corona Cases : राज्यात आणि विशेषकरुन मुंबईत कोरोनानं प्रकोप केला होता. यात मुंबईमध्ये तर कोरोनानं सर्वात जास्त कहर केला होता. आता मुंबईतील आकडा गेल्या काही दिवसांपासून एक हजारांच्या देखील येत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 973 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1207 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,76,400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16,347 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 515 दिवसांवर पोहोचला आहे.
धारावीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद
आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील धारावीमध्ये फक्त एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद झाली आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेनं माहिती दिली आहे. धारावीत सध्या एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 20 असल्याचं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेने घातलेले निर्बंध आणि उपाययोजनांमुळं धारावीसारख्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी आज दुसऱ्या दिवशी केवळ एका रुग्णाची नोंद झाली आहे. धारावीत आजवर एकूण 6830 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज दादरमध्ये 10 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दादरमध्ये आतापर्यंत 9476 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर आज माहिममध्ये 10 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. माहिममध्ये आतापर्यंत 9812 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
पुणे शहरात 349 नवीन रुग्णांची नोंद
पुणे शहरात आज नव्याने 349 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 71 हजार 577 इतकी झाली आहे. शहरातील 699 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 58 हजार 374 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 7 हजार 872 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 25 लाख 26 हजार 221 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 4 हजार 842 रुग्णांपैकी 721 रुग्ण गंभीर तर 1372 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.पुणे महापालिका हद्दीत नव्याने 21 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 361 इतकी झाली आहे.
राज्यात आज तर 14,152 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात आज तर 14,152 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 20,852 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 289 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. राज्यात आज एकूण 1,96,894 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 55,07,058 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.86% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 14,75,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7,430 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.