मुंबई : नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते बंद केले असून अनेकांना ताब्यातही घेतलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, मुंबईत दंगली घडवण्याचा शिवाजी पार्क पोलिसांचा डाव होता का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला. पोलिसांनी काही स्थानिकांना या आंदोलकांना विरोध करण्यास सांगितलं असून त्या बदल्यात संरक्षणही देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. 

Continues below advertisement

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्याचवेळी मुंबईतही त्याचे पडसाद उमटत असून कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी पार्ककडे  जाणाऱ्या सगळ्याच मार्गांवरती पोलिसांकडून बॅरेकेडिंग करण्यात आलं आहे. तसेच अनेकांना ताब्यातही घेण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाची मागणी करत दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

दरम्यान, शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. अनेकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. त्यापैकी काहीजण हे फक्त फिरण्यासाठी आले होते तर काहीजण जॉबवरून घरी जाणारे होते. आम्हाला काहीही न विचारता पोलिसांनी ताब्यात घेतलं, आम्ही आंदोलक नाही असं सांगूनही पोलीस काहीही ऐकत नसल्याचा दावा यावेळी त्या तरुणांनी केला. 

"स्थानिकांना बोलावून दंगल घडवण्याचा प्रयत्न"

शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनात दंगल घडवण्याचा पोलिसांचा डाव असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये स्थांनिकांची बैठक घेतली आणि सांगितलं की तुम्ही आंदोलकांना अडवा, त्यांना विरोध करा. तुम्ही आंदोलकांच्या अंगावर जा, आम्ही तुम्हाला संरक्षण देतो असं सांगण्यात आलं. त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. 

ही बातमी वाचा: