मुंबई : लोकल सेवेच्या मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज (रविवार) सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, सोमवार 12 मार्चच्या मध्यरात्री घाटकोपर इथेही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.


मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप फास्ट मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 4.15 पर्यंत ब्लॉक आहे.

- त्यात, कल्याणहून सुटणाऱ्या सर्व फास्ट लोकल सकाळी 10.37 ते दुपारी 3.56 मध्ये दिवा आणि परळ स्थानकांदरम्यान स्लो मार्गावर चालवल्या जातील. परळनंतर त्या पुन्हा फास्ट मार्गावर चालवल्या जातील.

- सीएसएमटीहून सकाळी 10.05 ते दुपारी 3.22 पर्यंत सुटणाऱ्या फास्ट-सेमी फास्ट लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांत थांबतील.

- ब्लॉक कालावधीत दादर आणि सीएसएमटीकडे येणाऱ्या सर्व मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांत स्लो मार्गावर चालवल्या जाणार आहेत.

रत्नागिरी-दादर पॅसेंजर दिवा स्थानकात थांबणार

रविवारी रत्नागिरी-दादर पॅसेंजरला दादरऐवजी दिवा स्थानकात अंतिम थांबा राहील. परतीच्या मार्गावर दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातूनच सुटेल. दिवा स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांच्या सुविधेसाठी दादरहून दु. 3.40 वाजता विशेष लोकल सोडण्यात येणार आहे.

हार्बर मार्गावरील ह्या सेवा बंद

- हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक आहे.

- सीएसएमटी/वडाळ्याहून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे/अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सकाळी 9.56 ते दुपारी 4.43 पर्यंत बंद राहणार आहे.

- अप हार्बर मार्गावर पनवेल/बेलापूर/वाशी ते सीएसएमटी सेवा सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 आणि वांद्रे/अंधेरी लोकल सेवा सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.09 पर्यंत बंद राहील. या कालावधीत पनवेल आणि कुर्लाहून विशेष फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.

घाटकोपर स्थानकात विशेष ब्लॉक

सोमवार, 12 मार्च रोजी मध्यरात्री 12.45 ते पहाटे 5.55 पर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील जुना पादचारी पूल पाडण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

- या ब्लॉकमुळे एलटीटी-अलाहाबाद एक्स्प्रेस पहाटे 5.23 ऐवजी सकाळी 6 वाजता सुटेल.

- एलटीटी-मुझफ्फराबाद एक्स्प्रेस दुपारी 12.15 ऐवजी दुपारी 2.20 वाजता सुटेल.

- शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस पहाटे 4.50 ऐवजी सकाळी 7 वाजता येईल.

- शालिमार-एलटीटी पहाटे 5.50 ऐवजी सकाळी 7.30 वाजता येईल.

जिते, आपटा स्थानकांमध्येही ब्लॉक

कोकण रेल्वे मार्गावरील आपटा आणि जिते स्थानकांदरम्यान मंगळवार, 13 ते 18 मार्चदरम्यान आणि 22 मार्च आणि 5 एप्रिल या दोन दिवशीही ब्लॉक घेतला जाणार आहे. खारपाडा इथे पूल बांधला जाणार असून, त्यासाठी हा ब्लॉक आवश्यक आहे. या ब्लॉकच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या मेल/एक्स्प्रेसच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.