म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी सोडत आज जाहीर झाली. यावेळी प्रकाश मेहतांना मुंबईतील म्हाडाची लॉटरी कधी अशी विचारणा केली असता, त्यांनी याबाबतची माहिती दिली.
प्रकाश मेहता म्हणाले, “येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मुंबई म्हाडाची लॉटरी जाहीर होईल. सालाबादप्रमाणे सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होईल. कोणत्या भागात किती घरे, नेमकी तारीख कोणती वगैरे सर्व माहिती लवकरच जाहीर केली जाईल”
मुंबई मंडळाच्या येत्या लॉटरीत पंतप्रधान आवास योजनेची घरं नसतील. मात्र, 90% घरं अल्प, मध्यम उत्पन्न गटातील असतील, असं प्रकाश मेहता यांनी सांगितलं.
म्हाडाकडे मुंबईत घरं बनवण्यासाठी आता पुरेशी जागा नाही, मात्र येत्या 2 वर्षात एसआरए, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त परवडणारी घरे देणार असल्याची घोषणा प्रकाश मेहता यांनी केली.
म्हाडा लॉटरी 2018, गरिबांसाठी घरांची संख्या जास्त!
कोकण मंडळाच्या 9 हजार 18 घरांच्या लॉटरीची सोडत जाहीर झाली. ऑनलाइन नोंदणीद्वारे आलेल्या 55 हजार अर्जांमधून 9 हजार घरांच्या लॉटरीची सोडत होती. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.
संबंधित बातम्या
म्हाडा लॉटरी 2018, गरिबांसाठी घरांची संख्या जास्त!
म्हाडाला उपरती, यंदा स्वस्त घरांची संख्या जास्त!
30 वर्षांपासून बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना म्हाडाची घरं मिळणार