Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News: मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये पुढील महिन्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीमध्ये भाडेवाढ (Mumbai Auto Taxi Rate Hike) होणार आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाडीच्या प्रस्तावाला MMRTA ची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार 1 सप्टेंबर 2026 पासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये होणार आहे

Continues below advertisement

रिक्षाचा भाडं एक रुपयांनी, तर काळा पिवळ्या टॅक्सीचे भाडे दोन रुपयांनी वाढला आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये रिक्षाचे भाडं कमीत कमी पहिल्या दीड किलोमीटरसाठी 26 रुपयांवरून 27 रुपये झालं आहे, तर टॅक्सीचे भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये झाले आहे. ऑटो आणि टॅक्सी चालकांचे म्हणणे आहे की, गेल्या काही वर्षांत इंधन, वाहन देखभाल आणि इतर खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रवाशांची मागणी पुन्हा वाढली असली तरी चालकांच्या उत्पन्नावर वाढत्या खर्चाचा ताण आहे. (Mumbai Auto Taxi Rate Hike)

कुठेकुठे भाडेवाढ होणार? (Mumbai Auto Taxi Rate Hike Marathi News)

20 ऑगस्ट रोजी या संबंधीचा परिवहन आयुक्तांनी पाठवलेला  प्रस्ताव MMRTA ने मंजूर केला असून एक सप्टेंबरपासून मुंबई ठाणेनवी मुंबई, कल्याण, वसई, विरार, पालघर या सगळ्या भागासाठी ही भाडेवाढ निश्चित करण्यात आली आहे.याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती. हा प्रस्ताव मुंबई रिक्षा-टॅक्सी युनियन्सनी मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित आहे. यामध्ये इंधन, वाहनांची देखभाल-दुरुस्ती, विमा हप्ते आणि परवाना-संबंधित खर्च यांसारख्या वाढत्या परिचालन खर्चाचा (ऑपरेटिंग खर्च) उल्लेख करण्यात आला आहे.

Continues below advertisement

व्यवहारिक मराठी येत नसलेल्या रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस- (Marathi Compulsory Auto Taxi Driver)

मुंबईत मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर सुरू झालेल्या कारवाईचा आज दुसरा दिवस आहे. या मोहिमेमुळे प्रादेशिक परिवहन विभागाने नियम उल्लंघन करणाऱ्यांवर देखरेख आणि दंडात्मक कारवाई तीव्र केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाद्वारे ही तपासणी केली जात आहे. मुंबईत काल मराठी भाषेवरून 1 हजार 268 रिक्षा-टॅक्सी चालकांना परिवहन विभागाच्या नोटीस आरटीओकडून बजावण्यात आली आहे. तर मराठी शिकण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ, न शिकल्यास 3 महिन्यांसाठी बॅज निलंबित करण्यात येणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा