Ashfaque Bakery FDA Action : तुकाराम मुंढेंचे 'ऑपरेशन भेसळ क्लियर' सुरूच, चेंबूररमधील प्रसिद्ध 'अशफाक बेकरी'वर धाड, अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित करण्याचे आदेश
Chembur Ashfaque Bakery License Suspended : चेंबूर येथील अशफाक बेकरीमध्ये अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्याने FSSAI परवाना निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित आहे.

Chembur FDA Action News : मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेते आणि बेकरी चालकांच्या अस्वच्छतेविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आपला बडगा उगारणे सुरूच ठेवले आहे. चेंबूर येथील प्रसिद्ध 'अशफाक बेकरी' (Ashfaque Bakery) विरोधात अन्न सुरक्षा व स्वच्छता निकषांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना निलंबनाची (License Suspension) मोठी कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
चेंबूर येथील सम्राट अशोक नगर, आर. सी. मार्ग (R.C. Marg, Chembur) येथे असलेल्या या बेकरीची अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकतीच आकस्मिक तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी ही
FSSAI Inspection Report : 156 पैकी मिळाले अवघे 56 गुण
अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या तपासणी अहवालानुसार (अहवाल क्र. 1292645), बेकरीच्या पाहणीत एकूण 156 गुणांपैकी अशफाक बेकरीला अवघे 56 गुण (केवळ 36 टक्के) मिळवता आले. या तपासणीचा अंतिम निकाल 'नॉन-कमप्लायन्स' (Non-Compliance) म्हणजेच नियमांचे पूर्णपणे उल्लंघन असा नोंदवण्यात आला आहे.
Food Safety Violations : तपासणीत आढळल्या गंभीर त्रुटी
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी बेकरीची पाहणी केली असता तेथे अन्नपदार्थांची अत्यंत अयोग्य साठवणूक, कीटक प्रतिबंधक उपायांचा पूर्णपणे अभाव, अस्वच्छ वातावरणात पॅकिंग करणे आणि तापमान नियंत्रणातील गंभीर त्रुटी आढळून आल्या. तसेच जुना व नवीन माल वापरण्याच्या FIFO/FEFO पद्धतीचा अपुरा वापर आणि अन्नात संसर्ग (Cross-Contamination) रोखण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याचे उघडकीस आले.
Unhealthy Bakery Staff : कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची अन् स्वच्छतेची नोंद नाही
अन्न सुरक्षेसोबतच बेकरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षेसाठी आवश्यक पोशाख (Protective Gear), वैद्यकीय तपासणी अहवाल (Medical Certificates) आणि 'फूड सेफ्टी ट्रेनिंग'च्या (Food Safety Training) कोणत्याही नोंदी मालकाला सादर करता आल्या नाहीत.
FDA Action Mumbai : परवाना तात्काळ निलंबित करण्याचा प्रस्ताव
या सर्व गंभीर त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असून त्यांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन एफडीएने 'अशफाक बेकरी'चा FSSAI परवाना (क्र. 11522007000345) तात्काळ निलंबित करण्याची कडक कारवाई प्रस्तावित केली आहे. सर्व त्रुटींची पूर्तता होईपर्यंत आणि नियमांचे पालन करेपर्यंत बेकरीवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?





















