मुंबई : मुंबईतील चेंबूरमधील अमर महल सिग्नलजवळचा उड्डाणपूल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. पुलाचे बोल्ट निघाल्याने हा पूल दुरुस्तीसाठी बंद आहे. दुरुस्ती अधिकाऱ्याने यासंदर्भातली माहिती दिली आहे.
हा पूल बंद झाल्याने चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. पूल धोकादायक स्थितीत असल्याने त्याची दुरुस्ती गरजेची आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
A
संबंधित बातमी : चेंबूरमध्ये पुलाच्या दुरुस्तीचं काम, वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण
वाहतूक पोलिसांना मागील आठवड्याच्या शुक्रवारी पुलाचे दोन सांधे निघाल्याचं दिसलं. त्यानंतर उत्तरेच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक पुलावरुन बंद करण्यात आली. पण शनिवारी सार्वजनिक विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी केल्यानंतर पुलावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा रस्ता मुंबईला ठाणे आणि नाशिकशी जोडतो. शिवाय पूर्व द्रूतगती महामार्गावरील महत्त्वाचा पूल मानला जातो. आता जड वाहनांना पुलावर प्रवेशबंदी असून त्यांना खालचा रस्ता वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.