Mumbai Accident : मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, भरधाव डंपरखाली त्या माणसाच्या पायाचा चेंदामेंदा
Mumbai Accident : मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर भीषण अपघात झालाय. या अपघातात एका व्यक्तीला आपला पाय गमवावा लागला आहे.

Mumbai Accident : मुंबईच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (Jogeshwari Vikhroli Link Road) भीषण अपघात (Accident News) झालाय. भरधाव डंपरखाली एका व्यक्तीचा पाय चिरडला गेला आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे डंपर चालकाला पकडण्यात यश आले असून त्याला मेघवाडी पोलिसांच्या (Meghwadi Police Station) ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या (Mumbai Accident News) जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर रामवाडी बस स्टॉपजवळ मध्यरात्री 1 च्या सुमारास डंपर भरधाव वेगाने जात होता. यावेळी पायी चालणाऱ्या व्यक्तीला भरधाव डंपरने चिरडले. या अपघातात व्यक्तीच्या पायाचे अक्षरशः तुकडे झाले आहेत.
डंपर चालक पोलिसांच्या ताब्यात
अपघात होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. तर नागरिकांच्या सतर्कतेमुळे डंपर चालकाला पकडून मेघवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. मेघवाडी पोलिसांनी या प्रकरणी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तर या अपघातात डंपरखाली आलेल्या व्यक्तीला आपला पाय गमवावा लागला आहे.
सीआयएसएफ जवानाच्या वाहनाची रिक्षाला जोरदार धडक
दरम्यान, मुंबईच्या वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर सीआयएसएफ (CISF) जवानाच्या वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात हाजरा इस्माईल शेख या महिलेचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात रिक्षा चालक सोनू यादव आणि मृत महिलेच्या मुली शाहीन इस्माईल शेख, शिरीन इस्माईल शेख असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 3 एप्रिलच्या मध्यरात्री मालाडच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या सीआयएसएफ जवान धुंधराम यादव यांच्या कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. मात्र सीआयएसएफच्या गाडीतील जवानांनी दारू पिऊन चुकीच्या साईडने कार चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात (Vanrai Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























