Mumbai Best bus accident news: मुंबईत एका बेस्टबसचाट्रकलाधडकून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये बसमधील पाच ते सहा गंभीररित्या जखमी झाल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सव्वा सहाच्या सुमारास पश्चिम द्रुतगती मार्गावर (Western Express Higway) हा अपघात घडला. ही बस बोरिवलीहूनअंधेरीच्या (Andheri) दिशेने जात होती. गोरेगाव परिसरात वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जात असताना बेस्ट चालकाचे बसवरील (BEST Bus) नियंत्रण सुटले. यावेळी बस प्रचंड वेगात होती. नियंत्रण सुटल्यामुळेबेस्टबसने एका ट्रकला (Truck) मागून जोरदार धडक दिली. ही धडक जोरदार असल्यामुळे बसमध्ये असलेले पाच ते सहा प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जोगेश्वरीतीलहिंदुहृदयसम्राटबाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामध्ये बेस्टबसचा पुढील एका बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. तर धडक बसल्यामुळे ट्रकच्या मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे. ही धडक अत्यंत जोरदार होती. त्यामुळे दोन्ही वाहनांचे काही भाग तुटून रस्त्यावर पडले होते. सकाळची वेळ असल्यामुळे बेस्टबसमध्ये तुरळक प्रवासी होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. वनराई पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनीबेस्टबसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.
आणखी वाचा
