एक्स्प्लोर

Mulund Bridge Collapse : मुलुंड अपघात प्रकरणी कारवाईला वेग, पाच अधिकाऱ्यांना अटक अन् कंपनीवर गुन्हा दाखल 

Mulund Metro Slab Collapse :  मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने मुंबई फिरायला आलेल्या उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जन जखमी झाले आहेत. 

मुंबई : मुलुंड मेट्रोचा स्लॅब पडून झालेल्या अपघात प्रकरणात आता कारवाईला जोर आला असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्ट्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कंपनीला पाच कोटींचा दंड

अवधुत इनामदार हे डीबी हिल एलबीजी कंपनीशी सबंधित असल्याची माहिती आहे. मुलुंड दुर्घटनेला जबाबदार धरत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजीत साळवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसे आदेशच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मेट्रो मार्गाचं बांधकाम करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला एक कोटींचा दंड तर अपघाताला जबाबदार असणाऱ्या मिलन इंफ्रा कंपनीला पाच कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर एमएमआरडीएकडून मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 15 लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुलुंडमध्ये एलबीएस रोडवर वडाळा ते कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत. तसंच तीन वाहनं स्लॅबखाली दबली गेली. रामधन यादव असं मृत व्यक्तीचं नाव असून ते उत्तर प्रदेशचा रहिवासी होते. मुंबई फिरण्यासाठी आले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला. 

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावेळी हा स्लॅब कोसळला. एलबीएस रोडवरून ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक या अपघातानंतर बंद करण्यात आली होती. एमएमआरडीए या संपूर्ण मेट्रो मार्गाचं बांधकाम करत आहे. वेगवेगळ्या चार टप्प्यांचे चार वेगवेगळे कंत्राटदार आहेत. 

ज्या टप्प्यात हा अपघात झाला तिथलं बांधकाम टाटा प्रोजेक्टस लिमिटेड आणि चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनीकडे आहे. दरम्यान, या अपघातानंतर बंद करण्यात आलेला एलबीएस मार्ग तब्बल 7 तासांनी पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून मुलुंड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

मुंबई फिरायला आले अन् काळाने घाला घातला

दुर्दैवाने, या घटनेत मुंबई फिरण्यासाठी आलेले उत्तर प्रदेशातील रामधन यादव यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. रामधन यादव हे उत्तर प्रदेशातील जौनपूरमधील एका गावाचे सरपंच म्हणून काम पाहत होते. ते मित्रासोबत मुंबई फिरण्यासाठी आले होते. कळव्यात एका लग्नासाठी रामधन यादव आणि महेंद्र यादव रिक्षानं निघाले होते. त्याचवेळी मेट्रोचा सिमेंट ब्लॉक रिक्षावर कोसळला.  

मुंबई फिरल्यानंतर दोन दिवसात रामधनी यादव उत्तर प्रदेशात जाणार होते. या घटनेची माहिती मिळताच रामधन यादव यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर एकच हंबरडा फोडला.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 
धक्कादायक! दहीसरमध्ये बाईक पार्क करण्याच्या वादातून युवकाची हत्या, तासाभरातच आरोपीला अटक 
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget