मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) मान्सूनबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य मान्सूनच्या आगेकूचसाठी पोषक वातावरण तयार होत असून 16 मेच्या आसपास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेट समूह येथे मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या मान्सूनची अधिकृत सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकर होण्याची शक्यता असून, देशभरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लागलं आहे.
IMD Forecast : हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने 13 मे रोजी जारी केलेल्या निवेदनात मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं म्हटलं आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यंने मान्सूनच्या आगेकूचला गती मिळत आहे. मान्सूनच्या हालचालीसाठी समुद्रावरील वाऱ्यांची दिशा, आर्द्रता आणि वातावरणीय दाब यांसारखे घटक सध्या अनुकूल असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.
Heat Wave Alert : उत्तर आणि पश्चिम भारतात उष्णतेची लाट कायम
मान्सूनच्या हालचालीबरोबरच उत्तर-पश्चिम, पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. आठवडाभर अनेक भागांमध्ये उष्णतेची परिस्थिती गंभीर राहू शकते. Barmer येथे काल देशातील सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Heavy Rain Alert : ईशान्य आणि दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा अंदाज
13 ते 19 मे दरम्यान ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच तामिळनाडू, केरळ, माहे, पद्दुचेरी आणि दक्षिण कर्नाटकात 13 ते 17 मे दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आहे.
Weather Systems Update : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल
नैऋत्य आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले असून ते ‘well-marked low pressure area’ मध्ये परिवर्तित झाले आहे. याचा परिणाम पुढील काही दिवस देशातील विविध भागांच्या हवामानावर दिसून येणार आहे.
Maharashtra Weather Outlook : महाराष्ट्रासाठीही पुढील अंदाज महत्त्वाचा
मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची पुढील वाटचाल केरळच्या दिशेने होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा :
