Mumbai Monsoon: मुंबईत मान्सूनचं धमाकेदार आगमन, जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत पाऊस किती पडणार?IMD कडून मोठी अपडेट
Mumbai Monsoon: भारतीय हवामान विभागाच्या हवामानतज्ज्ञ शुभांगी भुते यांनी मुंबईत 26 आणि 27 मे रोजी अनुक्रमे 135 मिमी आणि 164 मिमी पाऊस झाल्याचं सांगितलं.

Monsoon in Mumbai मुंबई : मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती अधिकृतरित्या भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या हवामानतज्ज्ञ शुभांगी भुते यांनी 26 आणि 27 मे रोजी अनुक्रमे 135 मिमी आणि 164 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती दिली. पुढील आठवड्यात मुंबईत पाऊस कसा असेल याचा पूर्वअंदाज देखील त्यांनी वर्तवला. येत्या आठवड्यात मुंबईत पावसाची शक्यता नाही, असं त्या म्हणाल्या.
शुभांगी भुते म्हणाल्या, मुंबईत मान्सून स्थिरावला आहे, मान्सूमध्ये मुसळधार पाऊस होतो. 24,25 आणि 26 मे रोजी जोरदार पाऊस झाल्यातं त्या म्हणाल्या. त्यानंतर 26 आणि 27 मे रोजी मुंबईत अनुक्रमे 135 मिमी आणि 164 मिमी पावसाची नोंद झाली.
येत्या आठवड्यात मुंबईत पाऊस किती पडणार?
शुभांगी भुते यांनी 18 मे रोजी मुंबईत झालेला पाऊस हा मान्सूनचा पाऊस नव्हता तर तो चक्रीवादळामुळं निर्माण झालेल्या स्थितीमुळं झाला होता. मान्सूनची सुरुवात विशिष्ट हवामानाच्या पॅटर्न नुसार होते. पॅटर्न आणि चक्रीवादळाच्या स्थितीमुळं मुंबईत मोठा पाऊस होऊ शकतो. तो पॅटर्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. येत्या आठवड्यात मुंबईत पावसाची शक्यता नाही.
VIDEO| Mumbai Monsoon: Here's what IMD scientist Shubhangi Bhute said:
— Press Trust of India (@PTI_News) May 29, 2025
"The monsoon has officially set in Mumbai. We witnessed heavy rainfall on the 24th, 25th, and 26th of May, with the city receiving approximately 135 mm and 164 mm on the 26th and 27th, respectively. The… pic.twitter.com/V2Bchx2FbJ
मुंबईत पावसामुळं मोठं नुकसान
मुंबईत मुसळधार पावसामुळं शहरात झाडं पडणे, शॉर्ट सर्किट, घराच्या भिंती पडणे यासारख्या नेक घटना समोर आल्या. बीएमसीच्या माहितीनुसार मुंबईत पावसामुळं नुकसान झाल्याच्या 79 तक्रारी नोंद झाल्या आहेत. बीएमसीनं दिलेल्या माहितीनुसार पावसामुळं मुंबईतील वाहतुकीवर परिणाम झाला होता. मुंबईत शॉर्ट सर्किटच्या घटना 25 ठिकाणी झाल्याची माहिती समोर आली होती. तर, मुंबईत 45 ठिकाणी झाडं पडल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय बीएमसीनं सांगितलं की 9 ठिकाणी मुसळधार पावसामुळं घरांचा काही भाग कोसळला. तर, तीन जण जखमी झाले.























