भिवंडी : भिवंडी-निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करुन दंगल घडवणारा मुख्य सुत्रधार मोहम्मद युसूफ याला पोलिसांनी शनिवारी मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली. मोहम्मद युसूफ हा रजा अकादमी या संघटनेचा शहर अध्यक्ष आहे.
निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करुन दंगल घडवणे तसेच नागरिकांना भडकावून पोलिसांवर दगडफेक करण्यास भाग पाडणे यांसारखे आरोप या दोघांवर आहे. या दंगलीत दोन पोलिसांचीही जिवंत जाळून निर्घृण हत्या करण्यात आली होती. तर तत्कालीन उपायुक्त आर.डी. शिंदे यांच्यासह 39 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली होती. याप्रकरणी युसूफ रजा यांच्यासह 400 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. दंगलीनंतर युसूफ रजा हा फरार झाला होता. त्याच्या अटकेसाठी भिवंडीचे पोलीस उपायुक्तांनी देशातील सर्व एअरपोर्ट प्राधिकरणाला याबद्दल सतर्क केले होते.
यासंबंधित मिळालेल्या माहितीनुसार, युसूफला सौदी अरेबियातून भारतात येत असताना मुंबई एअरपोर्ट येथून सहार एअरपोर्ट पोलिसांनी ताब्यात घेऊन निजामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
भिवंडी दंगलीतील मुख्य सूत्रधार मोहम्मद युसूफ गजाआड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2018 12:33 PM (IST)
या दंगलीत दोन पोलिसांचीही जिवंत जाळून निर्घुण हत्या करण्यात आली होती. तर तत्कालीन उपायुक्त आर.डी. शिंदे यांच्यासह 39 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -