MNS Protest Mumbai News :  निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरुन चांगलच वातावरण तापल्याचं चित्र पाहा.लामिळत आहे. दिल्लीत  सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्ककडे जाणारे रस्ते बंद केले असून अनेकांना ताब्यातही घेतलं आहे. शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून आंदोलन केलं जात आहे. यावेळी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.  दरम्यान, यावेळी अमित ठाकरे यांनी पोलिसांची गाडी अडवली. 

Continues below advertisement

मुंबईत दंगली घडवण्याचा पोलिसांचा डाव होता का? संदीप देशपांडेंचा सवाल

दरम्यान, मुंबईत दंगली घडवण्याचा शिवाजी पार्क पोलिसांचा डाव होता का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला. पोलिसांनी काही स्थानिकांना या आंदोलकांना विरोध करण्यास सांगितलं असून त्या बदल्यात संरक्षणही देण्याचं आश्वासन दिल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. मनसेबरोबरच दादर मध्ये सेना भवन समोर शिवसेना युवा सेना कडून आंदोलन करण्यात येत आहे. CJP च्या समर्थांनात युवा सेना कडून आंदोलन करण्यात येत आहे. सेना भवन समोर मोठ्या संख्येमध्ये पोलिसांच्या बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. युवा सेना चा कार्यकर्ता सेना भवन समोर जमायल सुरुवात झाली आहे. आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु झाले आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलक शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे रस्त्यावर उतरले

दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांना सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हे रस्त्यावर उतरले असून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे या दोघांनीही पोलिसांची गाडी अडवलेली आहे आदित्य ठाकरे स्वतःही काय वेळापूर्वी गाडीवर चढलेले होते शिवसैनिकांना सोडणार नाही तोवर पोलिसांची गाडी जाऊ दिले जाणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. 

Continues below advertisement

शिवाजी पार्क परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात

सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी पार्ककडे  जाणाऱ्या सगळ्याच मार्गांवरती पोलिसांकडून बॅरेकेडिंग करण्यात आलं आहे. तसेच अनेकांना ताब्यातही घेण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाची मागणी करत दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमी परिसरात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.