Continues below advertisement

मुंब: महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना काँग्रेस पक्ष मात्र मनसेला (MNS) नवा भिडू म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यास तयार नाही. त्याचवेळी मतांची आकडेवारी पाहिल्यास, मनसेविना मुंबईत मविआचा खेळ जमणार नाही अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 2024 च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येतंय. मुंबई महापालिकेच्या (BMC Election) 227 पैकी 22 वॉर्डात मनसेच्या मतांचा मविआला थेट फायदा होईल असं चित्र आहे.

दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले, कलिना, भांडुप, घाटकोपर पश्चिम, अणुशक्ती नगर, चांदीवली, माहीम या विधानसभा मतदारसंघातील 22 वॉर्डात मनसेच्या मतांचा मविआला फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे मनसेबाबत सकारात्मक नसलेल्या काँग्रेसला आपला विरोध बाजूला ठेवत मनसेला सोबत घ्यावं लागतय की मनसेबाबत सकारात्मक असलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुसरी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Continues below advertisement

MNS Power In BMC Ward : कोणत्या वॉर्डात मनसे किंगमेकर?

Assembly Constituency 2024  Ward No. BJP + Shinde Sena Thackeray + Congress MNS
दिंडोशी Dindoshi 39 6,987 6,985 1,181
दिंडोशी Dindoshi 42 9,035 7,371 2,972
गोरेगाव Goregaon 51 11,131 10,055 1,339
गोरेगाव Goregaon 58 13,041 11,774 1,683
वर्सोवा Versova 61 11,267 11,111 1,166
जोगेश्वरी Jogeshwari (E) 53 7,542 7,502 727
जोगेश्वरी Jogeshwari (E) 74 12,274 10,394 2,076
विले पार्ले Vile Parle 88 9,933 8,294 3,011
कलिना Kalina 91 10,191 9,709 740
भांडुप Bhandup (E) 109 10,039 5,927 2,863
भांडुप Bhandup (W) 113 10,481 8,781 2,665
घाटकोपर Ghatkopar (W) 123 11,051 9,350 5,881
घाटकोपर Ghatkopar (W) 124 11,159 11,061 2,208
घाटकोपर Ghatkopar (E) 125 12,980 10,446 5,196
घाटकोपर Ghatkopar (W) 126 11,847 10,446 3,106
घाटकोपर Ghatkopar (W) 127 9,988 7,269 4,339
अणुशक्ती नगर Anushakti Nagar 144 10,300 4,677 6,850
अणुशक्ती नगर Anushakti Nagar 146 6,345 4,618 4,949
अणुशक्ती नगर Anushakti Nagar 148 6,672 4,632 4,446
चांदिवली Chandivali 161 17,575 15,199 3,897
माहीम Mahim 190 9,196 7,324 7,115
माहीम Mahim 192 9,399 6,146 6,392

ठाकरेंची ताकद वाढली

अर्थात ही आकडेवारी त्या विधानसभेतली आहे जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची तोंडं दोन वेगवेगळ्या दिशेला होती. आता तर दोन्ही ठाकरेंची हातमिळवणी झाली आहे. त्यामुळे या आकडेवारीत महापालिका निवडणुकीत भर पडण्याची शक्यताच जास्त आहे. या समीकरणाचा फायदा घेण्यासाठी फक्त दोन ठाकरे एकत्र येणं पुरेसं नाही, तर मनसेला मविआत एन्ट्री मिळाली तर मतांची होणारी गोळाबेरीज महायुतीच्या चिंतेत भर घालणारी ठरू शकते.

जो मतांची गोळाबेरीज करण्यात यशस्वी ठरतो तोच निवडणूक जिंकतो. या आकड्यांची जुळवाजुळव करण्याच्या नादात किती अभद्र युत्या आणि आघाड्या जन्माला घातल्या हे महाराष्ट्राएवढं आणखी कुणीच जास्त अनुभवलं नसेल. आता प्रश्न हा आहे की बेरजेचं राजकारण करण्यासाठी कोणता पक्ष आपली मूळ विचारधारा आणि नैतिकतेची वजाबाकी करण्याची तयारी दाखवणार?

ही बातमी वाचा: