Mumbai:  मंत्रालयाजवळील आमदार निवासातील जेवणाच्या दर्जावर पुन्हा एकदा गंभीर आरोप झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच्या एका व्हिडिओमधून जेवणात भाजीत सापडलेल्या सुतळीच्या तुकड्यामुळे पुन्हा एकदा कॅन्टीन व्यवस्थापनावर सवाल उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही आमदार निवासात निकृष्ट आणि शिळं जेवण दिल्याचा आरोप करत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या घटना ताजी असतानाच आता मंत्रालयातील नव्या ‘सुग्रास’ भोजनाचा व्हिडिओ समोर आला आहे.

भाजीत सापडला सुतळीचा तुकडा

या व्हिडिओमध्ये आमदार निवासातील भोजनात भाजीत सुतळीचा तुकडा दिसत असून, तो जेवण करणाऱ्या कर्मचाऱ्याने कॅमेऱ्यावर दाखवला आहे. "हेच खायचं का?" असा संतप्त प्रश्न करत त्यांनी व्यवस्थापनाकडून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे जेवण पुरवणाऱ्या  कॅन्टीनवर ताशेरे ओढले जात आहे.

आमदार निवासात शिळं आणि निकृष्ट जेवण दिल्यानं आमदार निवासात बुलढाण्याच्या आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आल्यानंतर या घटनेच्या गोंधळाचे व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असताना आमदार निवासातील 'सुग्रास'जेवणाचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. आमदार निवासात जेवणात भाजीत सुतळीचा तुकडा सापडल्याचा प्रकार घडल्यानं आता पुन्हा एकदा आमदार निवासातल्या जेवणाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण

आकाशवाणी आमदार वसतिगृहात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन ऑपरेटरला मारहाण केल्याचंही यावेळी दिसून आलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला. डाळाची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबाबत विचारणा केली, त्याचबरोबर यावेळी त्यांनी कोणीही बील देऊ नका असंही सांगितलं, त्याचबरोबर बील काऊंंटरवरती बसलेल्या ऑपरेटरच्या कानशिलात देखील लगावली. या घटनेचा आणि गोंधळाचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावरती व्हायरल झाले आहेत. यापूर्वीही मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे संजय गायकवाड यांनी एबीपी माझाला सांगितलं व आज सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याचंही ते बोलताना म्हणाले आहेत.