मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात (MLA Disqualification Case) मोठा झटका बसल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटामध्ये आता धुसफूस सुरु झाली असल्याची माहिती समोर आलीये. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेनेची 2018 ची घटना दुरुस्तीच अमान्य करत, उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून केलेली नियुक्ती अवैध ठरवली. आता या निकालानंतर उद्धव गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असून, याबाबत उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावली. 2018 ला पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का नाही यावरून पक्षात खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. याबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे सवाल उपस्थित केलेत. 


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावलेंचा व्हीप वैध ठरवत पक्ष शिंदेंचाच असल्याचा निकाल दिला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. त्यांनी म्हटलं की, 1999 नंतर 2018 साली शिवसेना पक्षाची घटना बदलाची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. त्यामुळे 2018 मधील घटना बदल ग्राह्य धरता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पक्षातील प्रमुख नेते उद्धव ठाकरेंकडे काही प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 


संजय राऊत, अरविंद सावंत मातोश्रीवर दाखल


घटनेतील बदल, संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्याने विधिमंडळ अध्यक्षाने विरोधात निकाल दिल्याचं पक्षातील एका गटाचं मत आहे.  याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत, अरविंद सावंत आणि सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झालेत. जर निवडणूक आयोगात घटनेतील बदलांसकट घटनेची प्रत सोपवण्यात आली असेल, तर एंडोर्समेंट कॉपी घेऊन पत्रकार परिषद घ्यावी अशी उद्धव ठाकरेंडकडे मागणी करण्यात आलीये. पण पक्षाकडे एंडोर्समेंट कॉपी नसेल तर संबधित नेत्यांना जाब विचारण्यात यावा अशीही मागणी उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली आहे.


उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष 


दरम्यान आता या सगळ्यावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जर 2018 मध्ये पक्षाच्या घटनेमध्ये बदल झाला अशी भूमिका जर ठाकरे गटाची आहे, तर त्यामध्ये त्रुटी कशा आढळल्या असा देखील सवाल उपस्थित केला जातोय. यावर उद्धव ठाकरे काय स्पष्टीकरण का हे पाहणं गरजेचं असणार आहे. 


हेही वाचा : 


सुप्रीम कोर्टाने भरत गोगावले यांचा जो व्हीप अवैध ठरवला, तुम्ही वैध कसा ठरवला? राहुल नार्वेकर यांचं उत्तर Exclusive