मुंबई: मिरा-भाईंदर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. कारण विद्यमान  6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सहा नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं.

यामध्ये काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि मनसेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.

येत्या ऑगस्ट महिन्यात मीरा भाईंदरमध्ये महापालिकेच्या निवडणुका असल्यानं काँग्रेस-राष्ट्रावादीला हा मोठा झटका मानला जात आहे.

शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक

  1. रवींद्र माळी, राष्ट्रवादी

  2. वंदना चके, राष्ट्रवादी

  3. सुहास रकवी, काँग्रेस

  4. हरिश्चंद्र म्हात्रे, काँग्रेस

  5. सलीम शेख, काँग्रेस

  6. अरुण कदम, मनसे जिल्हाध्यक्ष पालघर