डोंबिवली: नवनियुक्त राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्य मंत्रिमंडळाचं नवं खातेवाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप जाहीर केलेलं नाही. पण त्यांना गृह आणि कारागृह खात्याचा कारभार मिळाल्याचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत.

 

अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केलेलं नसताना त्याआधीच गृह आणि कारागृह खात्याचे राज्यमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी आपलं स्वतःचंच खातेवाटप जाहीर करून टाकलं आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याचंही या पोस्टरवर जाहीर करण्यात आलं आहे.

 

डोंबिवलीचे आमदार असलेले रविंद्र चव्हाण यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे हे पोस्टर लावले आहेत. यामुळे सुरुवातीलाच रवींद्र चव्हाण हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण यांची राज्यमंत्रीपदी निवड करुन आश्चर्याचा धक्का दिला होता.