मुंबई : यंदा म्हाडाच्या घरांची संख्या जास्त असणार आहे. मागील वर्षी घरांची संख्या कमी आणि अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी एकही घर नसल्याने म्हाडावर टीका झाली होती. त्यामुळे यंदा घरांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राने याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं आहे.
मुंबईत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 400, मध्यम उत्पन्न गटासाठी 200 घरं उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी मानखुर्दमध्ये 100 तर, अॅन्टॉप हिलमध्ये 300 घरे राखून ठेवण्याची म्हाडाची तयारी आहे.
मुंबईत घरांच्या किंमती पाहता सर्वसामान्यांना 'म्हाडा'च्या घरांचा मोठा आधार आहे. पण, अनेक कारणांमुळे 'म्हाडा'च्या घरांची संख्या कमी होत आहे. मागील वर्षाच्या लॉटरीत 819 घरांचा समावेश होता. या वर्षी लॉटरीत घरांची संख्या वाढवण्यासंदर्भात 'म्हाडा'मध्ये बैठका सुरु आहेत. यंदाच्या लॉटरीत साडेनऊशे ते एक हजार घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
यंदा लॉटरी उशिरा?
सर्वसाधारणपणे मे महिन्यात 'म्हाडा' घरांची लॉटरी काढली जाते. पण मागील्या वर्षी 10 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात आली होती. यंदाही लॉटरीला उशीर होण्याची शक्यता आहे. लॉटरीच्या घरांची जाहिरात किमान 45 दिवस आधी प्रसिद्ध करणं बंधनकारक असतं. पण, 'म्हाडा'चे सर्व वरिष्ठ अधिकारी सध्या विधिमंडळ अधिवेशनात व्यस्त असल्याने लॉटरीबाबत बैठका होत नाही. त्यामुळे अधिवेशन संपल्यावर या बैठकांना गती येईल, असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या वर्षीच्या घरांच्या किंमती अजून निश्चित झालेल्या नाहीत. रेडी रेकनरचे दर, जीएसटीनुसार घरांचे दर जाहीर होतील, असं सांगितलं जात आहे.
या भागांमध्ये घरं उपलब्ध
मानखुर्द, मुलुंड गव्हाणपाडा, विक्रोळी कन्नमवार नगर, घाटकोपर पंतनगर, अॅन्टॉप हिल, गोरेगाव, बोरीवली महावीर नगर या परिसरात म्हाडाची घरं उपलब्ध असतील.
घरांची संख्या
अल्प उत्पन्न गट - सुमारे 400
अल्प उत्पन्न गट - 380
मध्यम उत्पन्न गट - 200
उच्च उत्पन्न गट - 4
म्हाडाला उपरती, यंदा स्वस्त घरांची संख्या जास्त!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2018 08:13 AM (IST)
दरम्यान, या वर्षीच्या घरांच्या किंमती अजून निश्चित झालेल्या नाहीत. रेडी रेकनरचे दर, जीएसटीनुसार घरांचे दर जाहीर होतील, असं सांगितलं जात आहे.
फाईल फोेटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -